नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी मध्यरात्री डी मार्ट रस्त्यावर दोन खून आणि त्यातील तिसरा खून शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे या प्रकरणात दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गुन्ह्यांमधील दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकाने पकडले. आज न्यायालयाने या दोघांना 5 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात या पुर्वी दोन आरोपी अटकेत आहेत. नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात 4 एप्रिल रोजी रात्री 1 ते 1.30 वाजेदरम्यान साई लाला आणि त्याच्या मित्रांनी प्रफुल्ल उर्फ अरिजितसिंग गजाान चव्हाण याच्यावर आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला. त्यात अरिजितसिंग मरण पावला आणि त्यांच्या विरोधी पक्षातीलही एक मरण पावला. त्यांच्या विरोधी पक्षातील एक जखमी झाला. त्याला अरिजितसिंघच्या बंधूने दवाखान्यात मारून टाकले. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. ज्यात अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणात सोनु राऊत आणि साहेर या दोघांना अटक झाली. या प्रकरणातील फरार असलेले आरोपी शेख शाहरुख उर्फ कबुत्तर शेख अजगर (29) रा.खुदबईनगर चौरस्ता, महेबुबीया कॉलनी नांदेड आणि शेख उबेद शेख अजगर (23) रा.फेमस फंक्शन हॉल जवळ मिलत्तनगर नांदेड या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडल्याची माहिती पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे हे हजर होते. या प्रकरणातील एक साईलाला नावाचा आरोपी पकडणे आहे त्याला लवकरच पकडू असे सांगण्यात आले. या प्रकरणातील आरोपी साईलाला हा गुन्ह्यानंतर फरार असून तपासामध्ये नायगाव जि.नांदेड येथील मन्मथ वसंतराव मंगरुळे (25) आणि शामनगर नांदेड येथील दिग्वीजय गणेशराव नारगुडे (22) या दोघांनी साईलाला पळून जाण्यास आणि फरार राहण्यास मदत केली आहे हे निष्पन्न झाल आहे. त्यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या दोघांना पकडण्याची जबाबदारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पेालीस अंमलदार रवि बामणे, अजहररोद्दीन, रितेश कुलथे, बिरादार आणि दिपक ओढणे यांनी पुर्ण केली. संबंधित बातमी …. हल्ला, प्रतिहल्ला आणि रुग्णालयात खून — शहर हादरवणाऱ्या प्रकरणात सहा जणांना कोठडी Kanthak Suryatal Post Views: 2,509 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पदोन्नतीच्या माध्यमातून पोलीस उपनिरिक्षक झालेल्या 16 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या भाग्यनगर पोलीसांनी 4 चोरट्यांना पकडले;78 लाखांचा ऐवज जप्त; पोलीस कोठडी मंजुर