अर्धापूर (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे मक्का मदिना दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून तब्बल १६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ मे २०२५ ते २ सप्टेंबर २०२५ दरम्यान अर्धापूर (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथे ही घटना घडली. सोहेल अहमद खान रफीक अहमद आणि अफरिन खान सोहेल अहमदखान (दोघे रा. बद्दापूर, ता. अकोला, जि. अकोला) यांनी संगनमताने फिर्यादी व साक्षीदारांना मक्का मदिना दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने आरोपींनी फिर्यादीकडून बँक ऑफ बडोदा खात्यावर तसेच नूर हज उमरा टुर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क ठेवत वेळोवेळी एकूण १६,१०,१०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे. मात्र पैसे घेतल्यानंतरही प्रत्यक्ष दर्शनाची कोणतीही व्यवस्था न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शेख अतिउर्रहमान शेख वली (वय ३५, रा. अर्धापूर, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींवर बीएनएस २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि/भोसलें करत आहेत. पोलीस नागरिकांना आवाहन करत आहेत की, अशा प्रकारच्या धार्मिक पर्यटनाच्या आमिषांना बळी न पडता संबंधित संस्थेची पूर्ण पडताळणी करूनच व्यवहार करावेत. Kanthak Suryatal Post Views: 698 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री अतुल सावे लोकशाहीचा विजय आणि महिला अधिकारांचा लढा-प्रियांका गांधींची भूमिका