नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक १०.०४.२०२६ रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा, अनियमित प्रवासास आळा घालावा तसेच रेल्वे नियमांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली.
या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एकूण ९५४ अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
• (तिकीटविना प्रवास) – ६८१ प्रकरणे
वसूल रक्कम : ₹४,७९,२०५
• (अनियमित प्रवास) – १७७ प्रकरणे
वसूल रक्कम : ₹१,०५,१८५
* (नोंद न केलेले सामान) – ९६ प्रकरणे
या मोहिमेदरम्यान एकूण ₹५,९९,१४० इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
या तिकीट तपासणी मोहिमेत १६८ रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला, त्यामध्ये :
* २७ तिकीट तपासणी पथक सदस्य
* १२९ वाणिज्य व प्रवासी सुविधा विभागातील कर्मचारी
* १२ स्थानक कर्मचारी
विभागातील विविध स्थानके व गाड्यांमध्ये ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तिकीटविना व अनियमित प्रवासास आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा नांदेड विभागाकडून नियमितपणे राबविण्यात येतात, ज्यामुळे वैध तिकीटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना न्याय्य व सुरक्षित प्रवासाचे वातावरण उपलब्ध होते. प्रवाशांनी दंड व गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीटासहच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

