एचपीव्ही लसीकरणात बारुळ आरोग्य केंद्राची झेप

कंधार – जागतिक महिला दिन पासून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेत बारूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने उल्लेखनीय कामगिरी करत टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींना देण्यात येणाऱ्या या लसीकरणात आतापर्यंत २० लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून, ही संख्या जिल्ह्यातील सर्वाधिक आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे ४२ हजार लोकसंख्या असून, त्यापैकी ४२० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. लोकसंख्येच्या किमान एक टक्का उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
एचपीव्ही लसीबाबत काही पालकांमध्ये गैरसमज असल्याचे एचपीव्ही लस निदर्शनास आले आहे. मात्र, ही लस घेतल्याने गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यास मदत होते, असे स्पष्ट करत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी पुढे येऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश दुल्लेवाड यांनी केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश दुल्लेवाड, डॉ. एच. के. साखरे, बाबाराव येलुरे, हरी घडे, छाया तेलंगे, राम मोरे, संध्या शिंदे, लक्ष्मी पांचाळ, अश्विनी कांबळे, आप्पाराव पोले, सुमनबाई मजरे व हनुमंत शेटवाड आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!