या मंदिराची विशेष बाब म्हणजे येथे दररोज नियमित पूजा-अर्चना केली जाते. हनुमान जयंतीनिमित्त विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नांदेड तसेच परिसरातील विविध भागांतून सर्व समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवात नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी स्वतः उपस्थित राहून मंदिरात दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच अनेक नागरिक व यात्रेकरूंनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सेवा कार्य कैलासवासी स. अग्रेंज सिंघ संधू परिवाराच्या वतीने करण्यात आले. सध्या नांदेड मर्चंट बँकेचे व्यवस्थापक स. मनजींत सिंघ संधू हे ही सेवा निष्ठेने पार पाडत आहेत. उत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडला असून, या उपक्रमामुळे समाजात एकात्मता व धार्मिक सलोखा दृढ होत असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले.
– राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
7700063999
