खंडणीच्या आरोपातील युटूबर पत्रकार शेख याहियासह १८ जणांचे अतिक्रमण जमीनदोस्त 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने देगलूर नाका ते हैदरबागकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुमारे १८ ते २० अतिक्रमित दुकाने हटवली. सार्वजनिक रस्त्यावर वर्षानुवर्षे उभी राहिलेली ही दुकाने अखेर प्रशासनाच्या कारवाईसमोर टिकू शकली नाहीत. विशेष म्हणजे या अतिक्रमणांमध्ये स्वतःला पत्रकार म्हणून ओळख देणाऱ्या एका यूट्यूब पत्रकार शेख याहिया शेख इसाक याचे ही दुकान होते.

अतिक्रमण पथक अधिकारी अजितपालसिंघ संधू,रावण सोनसळे अनेक कर्मचारी  व पोलीस विभाग कारवाई करत असताना शेख याहीया याच्या  घरातील महिला मंडळी घटनास्थळी येऊन तीव्र विरोध करत होत्या. मात्र प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा होता.  शासनाची पोलीस चौकीच जर नियमांत बसते, तर सार्वजनिक जागेवर परवानगीशिवाय दुकान कसे उभे राहिले? महानगरपालिका अधिकाऱ्यांनीही स्पष्ट शब्दांत विचारणा केली की, अतिक्रमण करून दुकान बांधणे, लाईट मीटर घेणे, कॅमेरे बसवणे यासाठी सार्वजनिक जागा कोणी दिली?

काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे नगरसेवक  सय्यद फसिउद्दीन  यांनी शेख याहीया शेख इसाक सह त्याचा मुलगा आणि बशीर लाला यांनी  एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.त्या बाबत इतवारा पोल्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. स्वतःला समाजाचा आरसा म्हणवणाऱ्या पत्रकारांनी बातमी आणि वैयक्तिक आरोप यातील सीमारेषा पाळली पाहिजे.ज्या पत्रकारांनी खंडणीच्या गुन्ह्याच्या बातम्या लिहिल्या त्यांच्या बद्दल आरोप करत त्या गुन्ह्यातील आरोपी बशीर लाला किती ओएस घेतले बातमी लिहिण्यासाठी अशी विचारणा करीत आहे. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा.

इतरांवर अतिक्रमणाचे बोट दाखवणारे काही जण स्वतः नियम मोडताना दिसल्याने उंटावरून शेळ्या हाकणे ही म्हण खरी ठरल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. अखेर महानगरपालिकेने कोणताही भेदभाव न करता शेख याहिया या  यूट्यूब पत्रकाराचेही अतिक्रमण हटवले. कायदा सर्वांसाठी समान असतो, हे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!