नवीन नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या भूशास्त्र संकुलाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यभर आपला ठसा उमटवला आहे. संकुलातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.
भूवैज्ञानिक परीक्षेत चाणक्य तोरणे यांनी अखिल भारतीय स्तरावर ११ वा क्रमांक मिळवत सुमारे १० लाखांच्या वार्षिक पॅकेजसह यश संपादन केले. तसेच डॉ. पांडुरंग बलवंत आणि राकेश निकम यांची Central Water and Power Research Station येथे वैज्ञानिक पदावर निवड झाली असून त्यांना सुमारे १२ लाखांचे वार्षिक वेतन मिळणार आहे. याशिवाय मुंजाजी भोसले आणि वर्षा शेवाळे यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे.
प्रशासकीय क्षेत्रातही संकुलातील विद्यार्थ्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. पोशट्टी मुडशे यांची MPSCमार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागात अनिकेत राठोड, दीपक वाबळे (सहाय्यक भूवैज्ञानिक), सुधाकर लुटे (सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ) तसेच अनिल गाडेकर, अभिषेक आदमाने, राहुल मुंडे, करण डव्हळे आणि मनीषा भिलावेकर (कनिष्ठ भूवैज्ञानिक) यांनी यश मिळवले आहे. दरम्यान, २०२४-२५ या वर्षात एकूण १८ विद्यार्थ्यांनी CSIR-NET, UGC-NET, SET आणि GATE यांसारख्या राष्ट्रीय पात्रता परीक्षांमध्ये यश मिळवत संकुलाची मान उंचावली आहे.
१९९६ साली स्थापन झालेल्या या संकुलात भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूगोलशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी Maharashtra Remote Sensing Applications Centre आणि Mineral Exploration and Consultancy Limited यांसारख्या संस्थांशी सहकार्य करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसह ३ लाखांपर्यंत मानधनाची संधी मिळते.
भूजल व्यवस्थापन, भूकंपशास्त्र, खनिज संपत्तीचा शोध आणि ज्वालामुखी यांसारख्या विषयांमध्ये सखोल प्रशिक्षण दिल्यामुळे येथे घडणारे विद्यार्थी उद्योग व संशोधन क्षेत्रासाठी सक्षम मनुष्यबळ म्हणून पुढे येत आहेत.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांच्यासह संचालक, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी अभिनंदन केले असून, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी भूशास्त्र क्षेत्र करिअरची नवी सुवर्णसंधी ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.