३०+ गाड्या, ४ पोकलँड जप्त; महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह बिलोली (प्रतिनिधी)- तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३० ते ३३ वाळू वाहतूक गाड्या आणि चार पोकलँड यंत्रे ताब्यात घेतली. मात्र, या मोठ्या कारवाईनंतरही महसूल आणि आरटीओ प्रशासनाकडून तब्बल २४ तास उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून तीन ब्रास ऐवजी पाच ब्रास वाळू वाहतूक करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. ही बाब महसूल आणि आरटीओ नियमांचे उघड उल्लंघन आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व जप्त वाहनांवर स्वतःच पहारा ठेवला आहे. तरीही महसूल विभाग व आरटीओ पथक घटनास्थळी न पोहोचल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रशासनाचा विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, तहसीलदारांकडून पोकलँड रस्त्याच्या कामासाठी असू शकतात असे स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, वाळू घाटावर रस्त्याच्या कामाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न नागरिकांच्या शंकांना अधिकच बळ देणारा ठरत आहे. सगरोळी परिसरातील २६ वाळू घाट लिलावाद्वारे दिले आहेत हे वाळू घाट विजयकुमार सत्यनारायण अग्रोया रा. सोलापूर गल्ली लातूर यास दिले असल्याचे समजते, तरी प्रत्यक्षात कायद्याच्या नावाखाली बेकायदेशीर कामकाज सुरू असल्याचे आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून महसूल प्रशासनाला कारवाईचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.पोलिसांनी ताब्यात ठेवल्या वाहनांची किंमत १५ कोटीची असावी असा अंदाज आहे.वृत्त प्रकाशीत कारे पर्यंत तरी महसूल आणि आरटीओ विभाग तेथे आले नव्हते अशी माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांनी वाळू वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेऊन तेथे गार्ड लावला आहे त्या वाहनांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत .. 1. TS 16 UC 7183 Ashok lauland 2. ΜΗ-48-CO-3132 3. ΚΑ 56 6139 4. MH-22- AN 1919 5. ΚΑ 32 ΑB 4497 6. ΜΗ-55- TATA Sigha 7. MH-25- U1381 Ashok layland 8. MH26-BE-4441 ΤΑΤΑ 9. KA 28 D 6120 Ashok laybud 10. ΚΑ-39-A-2630 11. ΚΑ-51-C-8051 ΤΑΤΑ 12.MH40- N-7375 ΤΑΤΑ13. KA32- AA 0819 Ashok layland14. TS-07-UM3378 15. MH26 CH 5097 Bhart Benz 16. MH26- CV 5097 Bharat Berz 17. ΚΑ-56-8440 Ashok layland 18. MH20 GC-0400 ===0== 19. KA32-D-9663 TATA 20. MH 26- CH-4116 Ashok layland 21 MH 25-U-1189 TATA 22 KA39A-1669 Ashok layland23. TS-12- UD-6020 Ashok lay land 24. TG-15-T4101 Ashole layland25. TG 15-T5535 Ashok layland26. ΜΗ -06- BW 1146 A/L 27. without Number हायवा – TATA Sigha 28. ΚΑ-39- Α- 2236 Ashok layland 29. MH26 CV-5112 Bharat Beaz 30. TS-07 – UM-2865 Ashok layland 31 TS-07 – UM-2856 32 TS-15- UE-2279 33 TS-05-UA -1734 TATA Truck * JCB कंपनीचे 02 पोकलैंड * TATA कंपनीचे 03 पोकलैंड * कंपनीचे Laud T 7,02 फेकला * Hyundai कंपनीचे 01 पोकलैंडTyre संबंधित बातमी …. https://vastavnewslive.com/2026/03/21/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/ Kanthak Suryatal Post Views: 1,209 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जशास तसं उत्तर! इराणच्या हल्ल्याने इस्रायलची संरक्षण यंत्रणा फेल सगरोळी बस स्थानकात अवैध वाळू वाहतूक प्रकरण उघड; १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त