नांदेड -जिल्ह्यातील नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवळा (दे) या गावामध्ये संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने शाळेच्या परिसरात व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या माध्यमातून १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक ढवळे जि. एस, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, मारोती चक्रधर, इंदिरा पांचाळ, पांडुरंग गच्चे, मनिषा गच्चे, आनंद गोडबोले.आदिंची उपस्थिती होती.
यावेळी संत गाडगेबाबा यांचे विचार म्हणजे, ‘धोंडापाणी देव रोकडा सज्जनी, असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देव देवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. अशा बोलीभाषेतुन, समाज जागृती करणारे, केवळ परिसर स्वच्छतेचे जनकच नव्हे तर माणसाचे अंतरंग स्वच्छ करणारे, संत गाडगे बाबा यांच्या जयंतीदिनी त्यांना स्वच्छतेची कामे करून गावातील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांनी विनम्र अभिवादन केले. तसेच ग्राम पंचायत कार्यालयातही संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी केली.

या कार्यक्रमात प्रथमतः थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व धुप पुजा करून मान्यवरांनी व शालेय विध्यार्थ्यांनी अभिवादन केले. आणि परिसरातील काडी कचरा, दुर्गंधी साफसफाई करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले. यासाठी तेजल शिखरे, सोनल गोडबोले, मयुरी गोडबोले, अनन्या टिमके, सुप्रिया गच्चे, विश्वदीप झिंझाडे, शाहेद शेख, सिद्धांत गोडबोले, दीपक शिखरे, प्रेम गोडबोले, पंचशील गच्चे, पीरखाँ पठाण आदींनी परिश्रम घेतले.
