जवळा येथे विश्वशांती बुद्ध विहारामध्ये शिवजयंती साजरी

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड दक्षिण मधील तसेच लोहा तालुक्यातील सोनखेड सर्कल अंतर्गत येत असलेल्या, विश्वशांती बुद्ध विहार जवळा या ठिकाणी 396 वी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संरक्षण सचिव तथा आकाशवाणी प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा अध्यक्ष सुरेश गोडबोले, मा. सरपंच साहेब शिखरे, मा. सरपंच माधव पावडे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे, मा. ग्रा. प. सदस्य बापूराव पाटील गवळी, शिवसेना सर्कल प्रमुख नामदेव शिखरे, रमाई जयंती मंडळाच्या अध्यक्षा  भारतबाई निखाते, तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद गोडबोले, आरपीआय कार्यकर्ते धनराज गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रति रूपा समोर व बहुजन प्रतिपालक जाणते राजे डॉ. बाबासाहेबांच्या गुरूंचे गुरु, अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर दीपा ने धूपाने आणि पुष्पाने पूजा करून, अभिवादन करण्यात आले. विश्वशांती बुद्ध विहार जवळा या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या जयंत्या  व स्मृतिदिनानिमित्त  अभिवादन कार्यक्रम घेऊन, त्यांच्या आयुष्यातील चांगल्या कार्याची माहिती ज्ञान स्मरण करण्यात येते . अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांना या ठिकाणी उजाळा देण्यात आला.

यावेळी गावातील युवा कार्यकर्ते शंकर शिखरे, मदन शिखरे, राजू शिखरे, ज्ञानेश्वर शिखरे, मारुती चक्रधरे,  समता सैनिक दलाचे अहेलाजी गोडबोले, शिवाजी शिखरे, नामदेव एकनाथ शिखरे, मनोहर शिखरे, रामप्रसाद शिखरे, किरण शिखरे, मुंजाजी शिखरे, यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे जवान, श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, सार्वजनिक भीम जयंती मंडळ, सार्वजनिक शिवजयंती मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, विश्वशांती बुद्ध विहार समिती, त्यागमूर्ती रमाई जयंती मंडळ या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!