काबरानगर येथील श्री कृष्ण मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील काबरानगर येथील श्री कृष्ण मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविक-भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिराचे नुतनीकरण, मंदिर खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर, नवीन राधाकृष्णांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण ह्या सर्व गोड आठवणींचा २१ फेब्रुवारी हा दिवस आहे. श्री कृष्णांचा जन्म ८ वा व मंदिराचा वर्धापन दिन ही ८ वाच..! त्यामुळे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ असे सलग ४ दिवस धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १९ फेबुवारी रोजी सकाळी ७ ते ९ पर्यंत लुपिन डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सशुल्क माफक दरात आरोग्य तपासणी शिबिर, संध्याकाळी ७ च्या आरती नंतर स्त्री.. काल आज आणि उद्या या विषयावर शांभवी अरुंधती प्रवीण साले यांचे व्याख्यान, दि. २० फेबुवारी रोजी संध्याकाळी ७ च्या आरती नंतर  धन्यो गृहस्थाश्रमः या विषयावर ह.भ.प. विक्रम विनायक नांदेडकर यांचे व्याख्यान, दि. २१ फेब्रुवारी हा श्री कृष्ण मंदिर वर्धापन दिनी सकाळी ७ वाजता श्री राधाकृष्णाच्या मुख्य मुर्तीला अभिषेक दुपारी ४.३० पासून आष्ठ सेवा ऋग्वेद सेवा, यजुर्वेद सेवा सामवेद सेवा,  अथर्वेद सेवा, शास्त्र वेद सेवा, पुराण सेवा,  नृत्य सेवा, गायन-वादन सेवा, पुष्प व तुलसी अर्चण सेवा, दररोज  १० ते १२ होम हवन व सायंकाळी ७ वाजता महाआरती, दि.२२ फेब्रुवारी संध्याकाळी ७ च्या आरती नंतर महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, काबरानगर, पदाधिकारी, ट्रस्टी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!