नांदेड (प्रतिनिधी)-उमरी येथील न्यायाधीश के.एस. कुलकर्णी यांच्या संमतीने तालुका विधी समिती उमरी व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज पाहता यावे यासाठी दिवाणी तालुका न्यायालय क स्तर उमरी येथे अभ्यास सहल काढण्यात आली.
न्यायालयात प्रत्यक्ष खटल्या सोबतच मुद्देमाल, ई-फाईलिंग ईत्यादी बाबतची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. या अभ्यास सहलीत न्यायालयीन कर्मचारी, अभिवक्ता संघ उमरीचे सर्व सदस्य, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.नवनाथ अडकिणे, डॉ. जळबा हाटकर, डॉ. किशोर उघडे, डॉ. अप्पाराव जाधव व राज्यशास्त्र, लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.