एआय टुल्सचा वापर करतांना त्याला काय मागायचे आहे यासाठी मात्र माणुसच लागतो

स्वारातीम विद्यापीठात आयोजित कार्यशाळेतील विचारवंतांचे सुर
नांदेड(प्रतिनिधी)-आज कृत्रिम बुध्दीमता या नवीन तंत्रज्ञानाचे आगमन पत्रकारंासाठी सुखदायी की, दुखदायी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय कार्यशाळेत तज्ञांनी या संदर्भाने सकारात्मक विचार व्यक्त करत भविष्यातील जीवनात एआयपेक्षा जास्त मोठे काही तंत्रज्ञान येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण सुध्दा एआयचा वापर कसा केला पाहिजे यावर आपले विचार व्यक्त केले.
स्वामी रामानंद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती प्र.कुलगुरु अशोक महाजन, कुलसचिव डॉ.ज्ञानेश्र्वर पवार यांची होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक विचारवंत दैनिक सकाळचे डॉ.श्रीराम पवार, दैनिक लोकमतचे छत्रपती संभाजीनगर येथील संपादक नंदकिशोर पाटील, संचालिका मॅक्स उमन चॅलनच्या प्रियदर्शनी हिंगे, न्युज 18 मुंबईच्या फराह खान, छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक सकाळचे विभागीय संपादक संतोष शालीग्राम, स्वारातीम विद्यापीठातील आयक्युएसी विभागाचे संचालक डॉ.बी.सुरंेंद्रनाथ रेड्डी यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क अधिकारी डॉ.अशेाक कदम, माध्यम शास्त्र संकुलाचे डॉ.सुहास पाठक, आयआयएलचे संचालक डॉ.शैलेश वाढेर यांच्यासह माध्यम शास्त्र संकुल विभागातील अनेक लोकांनी केले. या कार्यशाळेत नांदेड शहरातील अनेक पत्रकार, विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलतांना फराह खान म्हणाल्या की, एआय तंत्रज्ञानाची सुरूवात ही आधुनिक क्रांतीची सुरूवात आहे. कॉपीपेस्ट केलेल्या बातम्यांमुळे जो गोंधळ होते तो एआयमुळे बदलता येतो. अनुवाद सहज होतो, भाषेतील त्रुटी दुर होतात. ईतिहासाचा संदर्भ घेता येतो. पण या सर्वांसाठी आपण एआयला काय मागावे हे खुप महत्वाचे आहे. आपण जशी मागणी करू तसे एआय आपल्याला देतो. एआयमुळे पत्रकारांच्या नोकऱ्या जातील याला भिती बाळगण्याची गरज नाही. कारण बातमी ही स्वत:च्या बुध्दीने तयार होते ती बुध्दी एआयकडे नाही. त्यासाठी त्याच्याकडे करायची मागणीच महत्वपुर्ण आहे.
या प्रसंगी नंदकिशोर पाटील म्हणाले की, आधुनिक पत्रकारीतेमधील आधुनिक या शब्दाची फोड करून आधु आणि निक अशा दोन पत्रकारीता असल्याचे सांगितले. ज्या माणसाच्या हातात ऍंडराईड मोबाईल आहे तो प्रत्येक माणुस पत्रकार झाला आहे. पण एआय आईची जागा घेवू शकत नाही. ज्याप्रमाणे आई बालकाला जन्म देते. त्याप्रमाणे बातमीचा जन्म पत्रकार देत असतो. आपण खरे बाळशास्त्री जांबेकरांचे वारस असू तर आपल्याला दर्पण एकदा पाहायलाच हवा. सर्वात प्रथम एआय वैद्यकीय क्षेत्रात आले आणि त्यानंतर आता सर्वत्र झाले. आम्ही पत्रकारांनी दोन पापे केली आहेत. पहिले पाप एस.टी.महामंडळला आम्ही नेहमीच बदनाम केले आणि दुसरे पाप आम्ही ग्रामीण क्षेत्रातील शासकीय वैद्यकीय सेवांना बदनाम केले आणि आम्ही केले म्हणून शासन सुध्दा त्याकडे लक्ष देत नव्हते आणि त्यामुळे सकारात्मक पत्रकारीता करणे जास्त आवश्यक आहे. ब्रेकींग न्युज आम्ही वृत्तवाहिन्यांकडून ऐकली पण आता ती मकत्तेदारी त्यांची राहिली नाही. याचे उदाहरण सांगतांना त्यांनी अहमदाबाद आणि बारामती येथील विमान अपघाताचे किस्से सांगितले. ज्यामध्ये एक छोटा मुलगी आणि एक छोटी मुलगी हे खरे मुळ फुटेजचे मालक आहेत. त्या दोघांनी जर आपला मालकी हक्क मागितला असता तर ते अब्जाधिश झाले असते. ऑपरेटरच्या चुकांमुळे आम्ही लाडकी बहीण योजनेला सुध्दा बदनाम केले. छोट्या छोट्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहण्याची गरज आहे. म्हणून शिकत राहा. जो पर्यंत सत्तेवर बसलेल्या माणसांना सत्याची भिती वाटत राहिल तोपर्यंत पत्रकारांना मरण नाही.
याप्रसंगी प्रियदर्शनी हिंगे म्हणाल्या की, तंत्रज्ञान आपल्या हातात असेल तर आपण अनेक गोष्टी घडू शकतो आणि तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. एआय या पध्दतीचा उपयोग महिलांविरुध्द झालेले काही किस्से त्यांनी मांडले. परंतू त्यासाठी वापर करणाऱ्याचे डोके शुध्द असले पाहिजे तर तो जास्त प्रभावी वापर करू शकतो.
याप्रसंगी डॉ.बी.सुरेंद्र रेड्डी यांनी डिजिटल सादरीकरण करून कोणत्या पध्दतीने एआयचा वापर करायचा हे सांगितले. त्यासाठी कोणते ऍप वापरायचे हे सांगितले. सोबतच पत्रकारांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बातम्यांना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवून शैक्षणिक क्षेत्राला वाचविण्याचे काम करावे असे सांगितले. त्यातील उदाहरण देतांना सांगितले की, स्वारातीम हे 30 वर्षाचे विद्यापीठ आहे आणि उस्मानिया विद्यापीठाला 110 वर्ष पुर्ण झाली आहेत. पण आम्ही त्यांना सॉफटवेअर देत आहोत. विकसीत महाराष्ट्र प्रकल्पचा आराखडा आम्ही तयार करून देणार आहोत. हे सांगतांना त्यांनी पत्रकारांनी कोण-कोणत्या बाबींचा उपयोग केला तर त्यांना फायदा होईल हे सांगितले.
याप्रसंगी डॉ.श्रीराम पवार यांनी सांगिेतले की, बातमी, विश्लेषण आणि आपले मत ही खरी पत्रकारीता आहे. काय घडले, त्याचे विश्लेषण काय आहे आणि त्यापुढे काय होणार आहे हे सांगणे म्हणजेच खरी पत्रकारीता आहे. मागच्या 30 वर्षामध्ये पत्रकारीतेत कोण-कोणते बदल झाले हे सांगतांना डॉ.श्रीराम पवार यांनी एका ध्येयाने सुरु झालेली स्वातंत्र्यापुर्वीची पत्रकारीता नंतर व्यवसायीक बनली आणि आज ती धंदेवाइज झाली आहे. आता पत्रकारांना पत्रकारीतेच्या मुळ गाभ्याला कधीच न विसरता नव्या कल्पना वापरून नवीन पध्दतीने बातम्या तयार कराव्या लागतील.
याप्रसंगी विशाल पाटील यांनी एआय अँकर आले तर त्यांच्यात संवेदनशिलता नसणार म्हणून पत्रकारांनी सर्व जाणीवा जिवंत ठेवून पत्रकारीता करावी.
याप्रसंगी संतोष शालीग्राम यांनी सांगितले की, त्यांनी एआय टुल्से वापर करून कसे-कसे ते वर्तमान पत्रात वापरले आणि त्यामुळे त्यांच्या संस्थेची प्रशंसा झाली. याप्रसंगी उपस्थित विद्यापीठाचे सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी दररोजच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींचा आढावा घेत. एआयचा वापर कसा सकारात्मक करता येईल हे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.विजय गोणारकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!