नांदेड- तालुक्यातील गोदावरी काठी असेलल्या जुने सोमेश्वर येथे मंगळवार 10 फेबुु्रवारीपासुन अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून या सप्ताहामध्ये महाराजांचे भागवतक किर्तन सुरु असून या सप्ताहास भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
महंत जीवनदास महाराज चुडावेकर व महंत राम भारती महाराज मोहनपुरा यांच्या कृपाशिर्वादाने सोमेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सोहळा व लक्ष्मण शक्ति कार्यक्रम 10 फेब्रुवारीपासुन सरु झाला असून या धार्मिक कार्यक्रमामध्ये पहाटे 4 ते 6 काकडारती, 7 ते 10 शिवलीलामृत ग्रंथ पारायण, 12 ते 4 भागवत कथा, 4 ते 6 भोजन पंगत, सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ, रात्री 8 ते 10 भावार्थ रामायण व नंतर हरी जागर श्रीमत भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प. सुधारकर महाराज पोवळे खैरगाव ता. हिमायतनगर यांची भागवत कथा, भाउसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या हस्ते लक्ष्मण शक्तिचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये तबला वादक मारोती महाराज पवनेकर, ऑर्गन वादक व गायक माउली महाराज जाधव बारडकर, पॅड वादक रोशन महाराज बरडे, झाँकी सजावट रामजी महाराज आदेगावकर, काकडा व हरिपाठ प्रमुख ह.भ.प. पांडुरंग माउली बोकारे, माधव बोकारे, महादू बोकारे, रामजी बोकारे, सुदाम बोकारे, लक्ष्मणराव बोकारे, मदनराव बोकारे, शिवाजीराव बोकारे, देवराव कौसे, गंगाधर महाराज हे या सप्ताहामध्ये सेवा देत आहेत.
या संपूर्ण सप्ताहमध्ये व्यंकटबुवा भारती रहाटीकर, सुदाम बोकारे, विक्रम बोकारे, वाहेगावकर, तानाजी बोकारे, ज्ञानेश्वर बोकारे, प्रकाश बोकारे हे भाविक भक्तांना भोजनदान करत आहेत. दि.17 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 12 ह.भ.प. अॅड. यादव महाराज वाईकर यांचे काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून ज्ञानेश्वर महाराज पारवेकर, रहाटी, जैतापूर, नाळेश्वर येथील भजनी मंडळ सहकार्य करत असून याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले असून याचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सोमेश्वर येथील गावकर्यांनी केले आहे.
मंदिरासाठी सुविधा पुरविण्याची भाविकांची आमदारांकडे मागणी
गोदावरी काठी असलेल्या जुने सोमेश्वर येथील महादेव मंदिरास राज्याचे तत्कालीन मंत्री डि.पी. सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये राज्य पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी प्राप्त होतो. महाशिवरात्री निमित्त परिसरातील भाविकांची दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. परंतु गावातुन या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे भाविकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे या हेमांडपंथी मंदिरास शासनाने पक्का रस्ता, उद्यान व कमान करुन द्यावी अशी मागणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई बालाजी कल्याणकर महाशिवरात्रीनिमित्त महाभिषेकासाठी मंदिरामध्ये आल्या असता त्यांच्याकडे भाविक भक्तांनी मागणी केली.
