नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता वाजेगाव परिसरातील छोट्या बंधाऱ्याजवळ ‘अबू शूटर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या आरोपीने अरबाज नावाच्या युवकावर गोळीबार केला. या हल्ल्यात अरबाज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, गोळीबार करणारा अबू शूटर हा पोलिसांच्या पाहिजे असलेले आरोपी यादीतील असून, जखमी अरबाजवरही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करत तपास सुरू केला असून फरार आरोपी अबू शूटरचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.या घटनेतील अन्य काहो प्रकार असतील तर ते पोलीस तपासात समोर येतील. या प्रकरणात आपल्या दंडात गोळी लागून जखमी झालेल्या अरबाज कडून नांदेड पोलिसांनी डिसेंबर २०२५ मध्ये एक गावठी पिस्तूल जप्त केलेले आहे.म्हणजे अरबाजचा इतिहास सुद्धा गुन्हेगारी वृत्तीचाच आहे. Kanthak Suryatal Post Views: 3,952 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 2022 मध्ये आरटीआय कायद्यानुसार मागितलेली माहिती देण्याचे आदेश भारताच्या पंतप्रधानांनी जे काम करायला हवे ते आज राहुल गांधी यांनी केले