नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये काय चालते याची सर्व माहिती मला मिळत असते. तेंव्हा नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी कोणत्याही भानगडी न करता अत्यंत पारदर्शकपणे व लोकाभिमुख कारभार चालवून महानगरपालिकेच्या कामकाजाच्या पावत्या जनतेने दिल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन खा.अशोक चव्हाण यांनी केले.
आज महापौर पदाची निवडणुक पार पडली त्यात भारतीय जनता पार्टीच्या सौ.कविता संतोष मुळे यांचा विजय झाला. उपमहापौर पदी भारतीय जनता पार्टीचे दिपकसिंह काशिनाथसिंह रावत यांची निवड झाली. सभागृहनेते पदी महापौरांनी ऍड. महेश कनकदंडे यांची नियुक्ती केली. या प्रसंगी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. तसेच जनताही उपस्थित होती.
सर्व प्रथम मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले की, जुन 2022 पासून सुरू असलेले पत्रकारांच्या भाषेतील प्रशासक राज आज समाप्त झाले आहे. हे प्रशासक राज 3 वर्ष 3 महिने 9 दिवस चालले. या कालखंडात केलेल्या कामांची यादी त्यांनी वाचून दाखवली आणि भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनाम्याला जनतेने तुम्हाला मतदान करून तुमचा संकल्पनामा मंजुर केल्याचे सांगितले.
याप्रसंगी भाजपा अध्यक्ष अमर राजूरकर यांनी 28 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर, उपमहापौर नांदेडमध्ये विराजमान झाला. त्यांनी सांगितले की, देशात नरेंद्र मोदी सरकार, राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आणि नांदेडमध्ये भाजप सरकार. मी कॉंगे्रसवाल्यांना सांगू इच्छीतो की, कैसे भगाया.
आ.बालाजी कल्याणकर यांनी आमच्या नगरसेवकांचा सत्ताधारी पक्षांला आमचा बिनशर्त पाठींबा असल्याचे सांगितले.
आ.आनंद बोंढारकार यांनी निवडणुकानंतर एकत्र येेणे हा धर्म आहे आणि विकासांच्या कामासाठी सर्वजण एकत्रीतपणे काम करू.नांदेडमध्ये वाहणारी गोदावरी नदी शुध्दीकरण प्रकल्प लवकरात लवकर राबू.
उपमहापौर दिपकसिंह रावत म्हणाले की, आता जनता राज सुरू झाले आहे. प्रशासन आणि जनतेतील दुरावा दुर करण्याचे कामच पदाधिकाऱ्यांचे असते. सभागृहात राष्ट्रगान सुरू असतांना एमआयएमचे नगरसेवक निघून गेले याचा निषेध त्यांनी यावेळी केला.
महापौर सौ.कविता संतोष मुळे म्हणाले की, मला विकासासाठी ही खुर्ची मिळालेली आहे. त्यासाठी मी कटीबध्द आहे. अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतील नांदेड शहर बनविणार.
याप्रसंगी खा.अजित गोपछडे म्हणाले की, अशोक चव्हाण आणि त्यांच्या टिमने मागील महिन्याभरात केलेल्या मेहनतीला जनतेने त्यांना 45 सदस्य निवडूण देवून गुणवत्ता यादीत उत्तीर्ण केले आहे. निवडूण आलेल्या भाजप सदस्यांमध्ये 26 महिला आहेत. म्हणजे मोदींचा महिला राज हा संकल्प तुम्ही पुर्ण करत आहात. हे सांगतांना खा.अजित गोपछडे यांनी महत्वाची बाब सांगितली की, आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी 83 लाख रुपये केंद्र सरकारला परत केले आहेत आणि त्यांचे कौतुक केले आहे. सोबतच मागच्या निवडणुकीच्या काळात अमरनाथ राजूरकर यांनी केलेलेल्या मेहनतीचे कौतुक करत त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवा असे खा.अशोक चव्हाण यांना सांगितले. सोबतच अमरनाथ राजूरकरांनी हे तुम्हाला सांगायला सांगितले नाही हे सुध्दा स्पष्ट केले.
नवीन महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी कामे लवकर सुरू करा, हळू चाला आणि सुरक्षीत पोहचा या तत्वावर काम करण्याची गरज खा.अशोक चव्हाण यांनी सांगितली. मला नांदेडमध्ये काय घडते याची सर्व इत्यंभूम माहिती मिळत असते तेंव्हा कोणीच भानगडी करू नका. पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन ठेवा आणि आपले उत्तरदायित्व स्विकारा असे सांगिले. अमरनाथ राजूरकरांकडे लक्ष ठेवण्याच्या खा.गोपछडे यांच्या वाक्याला उत्तर देतांना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, तुम्ही अमरनाथ राजूरकर आणि संतुक हंबर्डे यांना कामाला लावले आहे हे मला माहित आहे आणि त्यामुळे मलाही कामाला लावले आहे याची मला जाणिव आहे. अशा प्रकारे आज जवळपास 3 वर्ष 3महिने आणि 9 दिवसांचा प्रशासक राज संपून लोकराजची सुरूवात झाली.
3 वर्ष 3 महिने 9 दिवसांचे प्रशासक राज संपून मनपात आजपासून लोकराज्य सुरू
