नांदेड – प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी18 वर्षापासूनची जुनी परंपरा कायम ठेवत 19 फेब्रुवारी 2026 रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाची विभागीय सार्वजनिक शिव जयंती मंडळाची कार्यकारिणी निवडण्यासाठीची बैठक दि.9 फेब्रुवारी 2026 सोमवार रोजी विभाग नियंत्रक नांदेड यांच्या दालनात दुपारी ठिक 2 वाजता विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडसकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगोपांग चर्चा विचार विनीमय करून पार पडली. व कार्यकारिणीची निवड एकमताने निवड करण्यात आली.
या निवड बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय यंत्र अभियंता (चालन) अभिजीत कोरटकर, विभागीय वाहतुक अधिकारी कमलेश भारती, विभागीय लेखाधिकारी देवदास जोगदंडे, विभागीय भांडार अधिकारी दिनेश आवघन, विभागीय उपयंत्र अभियंता (चालन) दिग्वीजय डी. नरंगले, विभागीय टायर नुतनीकरणचे उपयंत्र अभियंता प्रतीश रामटेके, बाबळी बंधारा आंदोलक नागोराव रोषणगावकर, माजी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, रामदास पेंडकर, कामगार नेते नंदु पाटील बेंद्रीकर, पैलवान ग्रुपचे अभिषेकभाऊ ताकझुरे, वाहतुक नियंत्रक सुनील मोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यकारिणीची खालीलप्रमाणे एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्ष डॉ.चंद्रकांत वडसकर, उपाध्यक्ष संतोष सगर, बाळू पेंटेवाड, कार्याध्यक्ष राहुल कोकाटे, शेख नवाब शेख बाबू, राहुल गजभारे, सचिव नंदु पाटील बेंद्रीकर, सहसचिव देविदास गोमासे, संतोष सुर्यवंशी, कोषाध्यक्ष अभिषेक भाऊ ताकझुरे, लक्ष्मण कपाळे, सहकोषाध्यक्ष शिवाजी निरडे, शाम पाटील सुर्यवंशी, संयोजक विनोद पांचाळ, स्टेज सजावट कमीटी गणेश कळसे, रामदास पेंडकर, शिवाजी निरडे, सदस्यपदी रमा जोंधळे, माधुरी बनसोडे, उज्वला झगडे, किरण कारामुंगे, अभय कदेवाड, गजानन टोनगे पाटील, गुणवंत एच.मिसलवाड, वंदना चिखलीकर, आम्रपाली शेळकीकर, शिवाजी रामगीरवार, वसंत साबळे, शेख भाई, गोविंद हाळे, मुर्ती पारडीकर, विठ्ठल शिरगीरे, लोकेश ठाकूर, चंद्रकांत पांचाळ, सुरज पारडकर, रऊफभाई, राऊत पेंटर, गौरी देशपांडे, गितांजली सावळे, महेश चटने, यमुनाताई उकंडे, सुरेखा पवार, यांची सदस्यम्हणून निवड झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप डॉ.चंद्रकांत वडसकर यांनी करून या बैठकीला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदु पाटील बेंद्रीकर यांनी केले तर सुत्रसंचालन माजी एसटी मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. आभार प्रदर्शन रामदास पेंडकर यांनी मांडले. यावेळी एसटी कष्टकरी कामगार कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी नांदेड विभागीय सार्वजनिक शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहिर अध्यक्षपदी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडसकर तर सचिवपदी नंदु पाटील बेंद्रीकर
