चित्रीकरण थांबवण्यास सांगितल्याने संताप; महिला पोलिसाला मारहाण

नांदेड (प्रतिनिधी)- न्यायालय परिसरात नव्हे तर न्याय दालनात व्हिडिओ चित्रीकरण करत असलेल्या एका महिलेला रोखण्याच्या प्रयत्नादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना आज दुपारी  घडली आहे. या प्रकरणी त्या महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी एक महिला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करत होती. न्यायालयाने संबंधित महिलेला चित्रीकरण थांबवण्याबाबत सूचना दिल्या. मात्र, त्या महिलेने न्यायालयाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वाद घातल्याचे समोर आले आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तसेच महिला पोलीस अंमलदारांना  बोलावण्यात आले. त्यावेळी महिला पोलीस अंमलदार रूपाली मोरेश्वर भारे (नेमणूक शिवाजीनगर पोलीस ठाणे ) यांनी संबंधित महिलेला न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितले. न्यायालय न्यायदालनातून बाहेर गेल्यानंतर त्या महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. तसेच पोलिसांच्या गणवेशालाही हानी पोहोचेलगणवेशाची बेअब्रू होईल अशा पद्धतीने वर्तन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी रूपाली मोरेश्वर भारे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात माधुरी अमोल कदम (३८) या महिलेविरुद्ध वृत्त लिही पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती . या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!