नांदेड –शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून, सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहात भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम असलेला सकळ सिद्धी गजानन हा अभंग महोत्सव आयोजित केलेला आहे. आधुनिक महिपती संत दासगणू महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथावर आधारित नांदेड येथील कवी देवीदास फुलारी यांनी 21 अभंग रचले असून दशरथ पुजारी यांच्या शिष्या आनंदी विकास यांनी या प्रारूप अभंगाला संगीतबद्ध केले आहे. या कार्यक्रमाचे निरूपण प्रख्यात निवेदक ॲड गजानन पिंपरखेडे हे करणार आहेत. या रचनांचे लोकार्पण खासदार तथा पूर्व मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण , खा. डॉ. अजित गोपछेडे, अमरनाथ राजुरकर ,डी पी सावंत , राहुल कर्डिले, अबीनाश कुमार, डॉ. महेश कुमार डोईफोडे आणि शंतनु डोईफोडे यांचे उपस्थितीत होणार आहे. या अभंग महोत्सवात साईप्रसाद पांचाळ ,वैभव पांडे ,वर्षा जोशी, विलीना पात्रा हे नामांकित गायक तसेच वादकही सहभागी होणार आहेत. पंकज शिरभाते यांचे व्हायोलिन ,विठ्ठल चुनाळे यांची बासरी आणि विश्वेश्वर कोलंबीकर यांच्या मृदगंधाचा नाद या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने होणाऱ्या या अभंग महोत्सवास रसिक भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन बालाजी इबितदार आणि राम शेट्टी तुप्तेवार यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 499 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अजित डोभाल यांच्या नावाने पसरलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह; सरकारच्या खुलाशाने खळबळ एपस्टीन फाईलमध्ये हरदीप सिंग पुरीचा खुलासा महुआ मोइत्रांचा ट्विट मध्ये; पण भारतीय मीडिया गप्प