पोलीस अंमलदाराच्या मुलाची राज्यस्तरीय स्पर्धेत चमक; पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

नांदेड (प्रतिनिधी)- सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत पोलीस अंमलदाराच्या मुलाने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. नांदेड येथील टायनी एंजल्स इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी प्रतीक उमाकांत दामेकर याने 17 वर्षांखालील 66 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. 19 वर्षांखालील 53 किलो वजनी गटात खेळाडूंनी 402.5 किलो वजन उचलत आपली ताकद सिद्ध केली. ग्रामीण भागातील खेळाडूंनीही क्रीडा क्षेत्रात आपण कुठेही कमी नसल्याचे या स्पर्धेत दाखवून दिले. या यशाबद्दल राज्य सरचिटणीस  संजय सरदेसाई व कार्यकारिणी सदस्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

लातूर विभागातून एकूण पाच खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी दीपक काकडे याने सुवर्ण पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच प्रतीक दामेकर याने रौप्य पदक मिळवत नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.

स्पर्धेदरम्यान नांदेड जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव क्षीरसागर एम. एम. यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल डीएसओ  टेंभरे, पोले , फिटनेस जिमचे संचालक वैकटेश यादव  तसेच कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.प्रतीकचे वडील उमाकांत दामेकर हे वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!