..अबब 15 हजार 570 बोगस जन्म नोंदी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील ग्राम पंचायत सावळेश्र्वर ता.कंधार यांच्या युजर आयडी क्रमांकावरून 15 हजार 570 जन्म नोंदी करण्यात आल्या आहेत. यावरून कोणतेही संगणक किंवा संगणकीय प्रणाली सुरक्षीत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. या संदर्भाने एका अज्ञात आरोपीविरुध्द उस्माननगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ग्राम पंचायत सावळेश्र्वर ता.कंधार येथील ग्राम पंचायत अधिकारी भावना माधवराव कावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या सन 2022 पासून ग्राम पंचायत अधिकारी म्हणून सावळेश्र्वर येथे कार्यरत आहेत. जन्म आणि मृत्यूची नोंदणी करण्यासाठी शासनाच्या सीआरएस पोर्टलची त्यांची युजर आयडी MH20362RE आहे. त्याचा वापर त्या स्वत: आणि ऑपरेटर मारोती नामदेव कदम हे करतात. त्या पोर्टलला वापरतांनाचा ओटीपी माझ्याच मोबाईलवर येतो. दि.2 फेबु्रवारी रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून सांगितले कि त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर सावळेश्र्वर गावात 15 हजार 570 जन्म नोंदी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय माहित आहे. पण मला काही माहिती नसल्यामुळे मी सांगितले. त्यानुसार सन जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ग्राम पंचायत कार्यालय सावळेश्र्वर येथे फक्त एक जन्म नोंद आहे.
पुढे या पोर्टलवर ऍड ऑल्ड इव्हेंट या टॅपचा वापर करून 1 जून 2025 ते 30 जून 2025 मध्ये 52 पुरूष व 60 महिलांच्या जन्माची नोंद आहे. यात तृतीयपंथीयांची सुध्दा नोंद आहे. हा सर्व कारभार 31 नोव्हेंबर 2020 पर्यंत सुरू होता. या पोर्टलवर एकूण 15 हजार 570 बोगस नोंदी आहेत. या माझ्या ऑनलाईन आयडीचा वापर करून कोणी तरी हा प्रकार केलेला आहे.
उस्माननगर पोलीसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 337, 336(3), 340(2) आणि भारतीय तंत्रज्ञान कायदा कलम 65 आणि 66 प्रमाणे अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा क्रमांक 18/2026 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार हे करणार आहेत.
या सर्व प्रकारावरून ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली की, शासनाच्या पोर्टलवर सुध्दा बनावटपणे नोंदी करता येतात. कारण अशाच पध्दतीचा आरोप मतदार नोंदणी आणि मतदार वगळणीमध्ये सुध्दा झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!