नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत हणमंतराव मिसलवाड (37 वर्षे सेवा) व चालक मा.श्री.मुरहारी एकनाथराव सोनकांबळे (चालक क्र.17959) (27 वर्षे सेवा) बजावून हे दोन कामगार-कर्मचारी वयाचे 58 वर्षे पुर्ण करून प्रदिर्घ प्रवासी सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल रापम आगार आस्थापनेकडून व आगार कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनींच्यावतीने दि.31 जानेवारी 2026 शनिवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता त्यांचा ह्दय सत्कार करून शुभेच्छारूपी निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांतराव वडसकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विचारपीठावर विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलींदकुमार सोनाळे, विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंदराव मुळे, चार्जमन योगेश्वर जगताप, संदीप बोधनकर, आगार लेखाकार सतीश गुंजकर, हेड कॅशियर गजानन बाबर, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, सुधाकरराव घुमे, मयुर तेलंगे, वाहतुक नियंत्रक सुनिल मोरे, पाळी प्रमुख मनोहर माळगे, विनायक चव्हाण, संजय खेडकर, कैलास वाघमारे, सेवानिवृत्त कर्मचारी सत्कारमुर्ती मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड, चालक मुरहारी सोनकांबळे, सौ.मंगलाबाई मुरहारी सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम रापम आगार संयोजन समितीच्यावतीने विचारमंचावरील सर्व मान्यवरांचा शाल,पुष्पहार देवून ह्दय सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांतराव वडसकर, विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे, विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंदराव मुळे यांच्या हस्ते दोन्ही सत्कारमुर्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, प्रवास बॅग, एसटी कामगार कल्याण गौरव समितीच्यावतीने स्मृतिचिन्ह, रोख रक्कम दोन हजार रूपये बक्षीस देवून ह्दय सत्कार करून शुभेच्छा रूपी निरोप देण्यात आला.
यानंतर वरील सर्व मान्यवरांचे समयोचित सेवापुर्ती संदर्भाने भाषणे झाली. यावेळी सत्कार मुर्ती मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात म्हणाले की, मी जरी आज सेवानिवृत्त होत असलो तरी भविष्यात एसटी लालपरीशी व कामगार कर्मचारी बांधवांशी प्रेम हे कायम राहील, असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज सेवापुर्ती गाठली आहे व सर्वांनीच आमचा सत्कार सन्मान केल्याबद्दल सर्वांचेच मनपुर्वक आभार मानून धन्यवाद देतो असेही ते शेवटी म्हणाले. शेवटी अध्यक्षीस समारोप विभाग नियंत्रक मा.श्री.डॉ.चंद्रकांतराव वडसकर यांनी करून दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याप्रती आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना आगार व्यवस्थापक मिलींद सोनाळे यांनी केले तर सुत्रसंचालन वाहतुक नियंत्रक सुनिल मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक संतोष ढोले यांनी मांडले. याप्रसंगी सर्वच स्तरातून आजी-माजी एसटी कर्मचारी, नातेवाईक, पाहुणे मंडळी, इष्टमित्र परिवार कष्टकारी-कामगार कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लगेचच सर्व उपस्थितांनी अल्पोउपहाराचा स्वाद घेतला.
एसटी डेपो नांदेड आगाराचे मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड व चालक मुरहारी सोनकांबळे सेवानिवृत्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
