नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे असलेल्या खंडोबा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 26 जानेवारीच्या रात्रीपासून 27 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली असून चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे लोखंडी पाईप कापून आत प्रवेश केला. मंदिरातील दोन दानपेट्यांमधील सुमारे 50 हजार रुपये रोख रक्कम तसेच 7 हजार रुपये किमतीचा डीव्हीआर असा एकूण 57 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
या प्रकरणी शंकर लक्ष्मण पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 26 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 27 जानेवारी रोजी सकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान ही चोरी घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेट्या फोडून रोकड व साहित्य चोरून नेले. या घटनेची नोंद कुंटूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर 17/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.
