राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेची जय्यत तयारी ; 29 जानेवारी रोजी स्पर्धेचे उदघाटन

राष्ट्रीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता

 नांदेड – नांदेड येथे राष्ट्रीय शालेय नेटबॉल (14 वर्षेमुले-मुली व 17 वर्षेमुली) क्रीडास्पर्धा सन 2025-26 चे आयोजन 27 जानेवारी ते 01 फेब्रुवारी,2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून जवळपास एक हजार ते 1 हजार 200 खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आयोजन समिती, राष्ट्रीय नेटबॉल् क्रीडा स्पर्धा राहुल कर्डिले यांचे अध्यक्षतेखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पर्धा आयोजन- नियोजन समिती, खेळाडू स्वागत समिती, निवास व भोजन समिती, मैदान, तांत्रीक, वाहतूक, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त, स्थानिक पर्यटन, सांस्कृतीक कार्य समिती, स्वच्छता व इतर समिती गठीत करण्यात आली असून स्पर्धेची जय्यत तयारी पुर्ण झालेली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रम 29 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11 वा. श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे बाबा बलविंदरसिंघजी व इतर मान्यवर यांचे हस्ते होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र व नांदेडकरांसाठी एक मेजवानीच राहणार आहे. तरी या स्पर्धेसाठी जिल्हयातील खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय स्तर शालेय नेटबॉल (14 वर्षे मुले-मुली व 17 वर्षे मुली) क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर 2 ते 26 जानेवारी, 2026 या कालावधीत इंदिरा गांधी मैदान, नांदेड येथे संपन्न झाले आहे.

या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत   श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभाग होणार आहे. सदर संघाची जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. यासाठी क्रीडा मार्गदर्शक 14 वर्षे मुले- मुलीसंघाकरीता समिर सिखीलकर- पुणे व प्रवीण कुपटीकर- नांदेड तर संघव्यवस्थापक म्हणुन संजय चव्हाण-नांदेड व रुकसाना मुलानी- सांगली हे आहेत. तर 17 वर्षे मुली संघाकरीता क्रीडा मार्गदर्शक म्हणुन निखील पोटदुखे- चंदप्रूर हे तर संघ व्यवस्थापक म्हणुन महेशकुमार काळदाते- परभणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या संघात खालील खेळाडूंचा समावेश असून यामध्ये 14 वर्षे मुले– कार्तिक वाघ-धुळे, निखिल राजपूत-पुणे, यश पावडे-अमरावती, राज वाघ-धुळे, साहिल मुलानी-सांगली, साई गजभारे-नांदेड, अनमोल जाधव-भंडारा, विरोचन शिंदे-छ.संभाजीनगर, अनिरुध्द लंगोटे-सांगली, आयुष येरणे-चंद्रपूर, धनुष झावरे-संगमनेर तर 14 वर्षे मुलीच्या संघात – भावनागावडे-धुळे, सृष्टी गायकवाड-हिंगोली, वेदिकातनपुरे-अहिल्यानगर, मोहिनी पडोळे-अमरावती, नंदिनी  जगदेवे-भंडारा,अनुष्कागायकवाड-सांगली,गीताकांबळे-नांदेड, ऋतुजावाघ-धुळे, समृध्दीपवार-भंडारा,दुव्रादापले-मुंबई,रोशनी बनसोडे-सांगली, रक्षितारवीकुमारबकवाड-नांदेड, तसेच 17 वर्षे मुलीच्या संघात अक्षता कोकणे-अहिल्यानगर, विशालाक्षी राठी-अहिल्यानगर, नेत्रा कांसरा-मुंबई, अनुष्का चामलाटे-अमरावती, पुर्वश्री योगेश वाघ- नाशिक, सईइजाते-परभणी, कविता नाईक-पुणे, कुशी हलमारे-गोंदिया, अश्विनी व्ही.तांबारे-नांदेड, जिज्ञासा जिवनसिंग चौहाण-छ.संभाजीनगर, आघाव जान्हवी-धुळे, ईशा पाटील-सांगली या खेळाडूंचा समावेश आहे.

सदर राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर समारोप कार्यक्रम प्रसंगी  जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, गंगालाल यादव, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, (राज्य क्रीडा मार्गदर्शक), मारोती सोनकांबळे, क्रीडा अधिकारी, बालाजी शिरसीकर, सी.आर.होनवडजकर, (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन) श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, जिल्हा संघटक गाईड श्रीमती रुपाली मुधोळकर, प्रवीण कुपटीकर (सचिव), कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे,रवीकुमार बकवाड, सुमेध गायकवाड आदीनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!