प्रजासत्ताक दिनी एसटी डेपो नांदेड आगार येथे कामगार-कर्मचाऱ्यांचा सन्मान, बक्षीस वाटप

नांदेड –  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.26 जानेवारी 2026 सोमवार रोजी सकाळी ठिक 07.30 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीतानंतर लगेचच भारतीय संविधानाच्या उद्दिषीकेचे  (सरनामा) वाचन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी करून सर्व कष्टकरी कामगार-कर्मचाऱ्यांना सामुहिकरित्या शपथ दिली. यानंतर राज्य गीत वाजविण्यात  आले. यावेळी प्रजासत्ताक दिन, चालक दिन, राष्ट्रीय रोड सुरक्षा, इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून सुरक्षित वाहन चालवून प्रवाशांना सुरक्षित सेवा देवून इंधनबचत करून सेवा दिल्याबद्दल आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कामगार-कर्मचाऱ्यांचा सुरक्षित सेवेचे पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे, वीस वर्षे, पंचविस वर्षे आणि त्यापुढे चालकांनी सुरक्षित सेवा बजावल्याबद्दल एकुण 20 चालकांचा व ई-बस एस-व्ही ट्रान्स प्रा.लि.चे 3 उत्कृष्ठ चालक यांचा सुरक्षित सेवेचे बॅच बिल्ले देवून, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देवून आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कामगार-कर्मचाऱ्यांना प्रवासी सेवेबद्दल सखोल असे मार्गदर्शन करून संबोधीत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक संतोष ढोले यांनी मांडले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मिलींदकुमार सोनाळे, बसस्थानक प्रमुख यासीन हामीद खान, आगार लेखाकार सतिश गुंजकर, चार्जमन योगेश्वर जगताप, संदीप बोधनकर, ईबस एस-व्ही ट्रान्स प्रा.लि. कंपनीचे डेपो मॅनेजर ज्ञानोबा आढाव, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, सुधाकर घुमे, मयुर तेलंगे, मोहमद ताजोद्दीन, वरिष्ठ लिपीक सुरेश फुलारी, संतोष ढोले, पाळी प्रमुख मनोहर माळगे, विनायक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रजासत्ताक दिन व बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळ्यास रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू आणि भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!