हिंद दी चादर शहीदी समागमात जनकल्याण चिकित्सा शिबिरास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड– हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरु ग्रंथ साहिब सेवा संस्थेच्या गुरु का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत.

*कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण*

कार्यक्रमाचा सर्व भाविकांना सहज लाभ घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रंगमंच परिसरात तसेच इतर दर्शनी भागात, लंगरच्या ठिकाणी स्क्रीनिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासोबतच कार्यक्रमाची लाइव्ह लिंक https://youtube.com/live/Am_ofc2n8ig?feature=share उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पिण्याचे पाणी व सुरक्षा, लंगरची व्यवस्था यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा शहीदी समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!