नांदेड-“सिंगल मदर्स गृपचे”जुन्या रूढीं प्रथांना मूठमाती देत हळदी कुंकु संपन्न. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातुन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांची उपस्थीती होती.हळदी-कुंकवाच्या कार्यात विधवा महिलांना डावलण्याची अनिष्ट प्रथा आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाळली जाते.तिच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थितीवरून तिचा सन्मान ठरवू नये” या पुरोगामी विचाराने प्रेरीत होऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नादेडच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे,सामाजिक कार्यकर्त्या शकीला शेख,लेखिका रुपाली वागरे/वैद्य यांनी “सिंगल मदर्स गृप” चे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी स्वप्ना भागेश कुलकर्णी, मनिषा दिनेश पाठक मधु अमोल भुजबळे, भाग्यश्री विश्वनाथ कानगुलवार(वीर पत्नी), पुजा प्रल्हाद हुंगरगे,वंदना महेश दिक्षित,सुरेखा सुधीर गावंडगावकर, शुभांगी कीर्तिकुमार बासरकर,
सोनाली उमाकांत पेठकर ,शोभा चंद्रकांत देशमुख, स्वाती प्रकाश कल्याणकर, रजनी प्रवीण करकरे, सुहासिनी अशोक पंडित, दीपा बळवंत कुलकर्णी, सोनिया राठोर, प्रियांका गणेश लुटे आणि इतर अनेक महिलांची उपस्थीती होती.सवाष्ण महिलांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद तिला हे विशेष!
“सिंगल मदर्स गृपचे”जुन्या रूढीं प्रथांना मूठमाती देत हळदी कुंकु संपन्न.
