नियोजन बैठकीत कार्यक्रमातील विविध उपक्रमांचा आराखडा मंजूर
नांदेड प्रतिनिधी: नांदेड दक्षिण मतदार संघातील लोहा तालुक्यात येत असलेल्या जवळा दे येथील विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे त्याग मूर्ती माता रमाई जयंती महोत्सवाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. व यावेळी सर्व उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत सकाळी ध्वजारोहण त्यापूर्वी विविध स्पर्धा प्रमुख व्याख्यात्यांचे मार्गदर्शन दुपारी भव्य देखाव्यासह गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक आणि त्यानंतर सायंकाळी रुचकर भोजनदान यासह आदी कार्यक्रमांचा आराखडा नियोजन बैठकीत मंजूर करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की नियोजन बैठकीला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम आराखडा काढून खर्च किती होणार याचा तपशील घेतला व त्यानंतर प्रत्येक महिलेस वर्गणी लावण्यात आली. त्यानंतर जयंती मंडळाची सर्व महिलांच्या उपस्थितीत कार्यकारणी गठित करून त्यामध्ये अध्यक्ष भारतबाई विठ्ठल निखाते, उपाध्यक्ष करुणाबाई जनार्धन गच्चे, सचिव मायाबाई भगवान गोडबोले, सहसचिव आशाबाई चांदु झिंझाडे, कोषाध्यक्ष गिरजाबाई रावण गोडबोले, सल्लागार वैजंताबाई बाबुराव गोडबोले, सहकोषाअध्यक्ष आम्रपाली सुरेश गोडबोले, सहसल्लागार वंदनाबाई रमेश गोडबोले, पदसिद्ध सदस्य अनिता अण्णाराव गच्चे, लक्ष्मीबाई श्रीरंग गच्चे, सुचित्राबाई किशन गोडबोले आणि सुनीताबाई शिवाजीराव गच्चे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गावातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व जिल्हा तालुका आणि ग्रामशाखेचे पुरुष महिला पदाधिकारी,विश्वशांती बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी, डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पदाधिकारी,भीम जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी, आणि समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह गावातील श्रद्धावान बुद्ध उपासक उपासिका व बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
