नांदेड (प्रतिनिधी)-महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगर विकास विभागाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. ही सोडत ना.माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण दि.22 रोज गुरुवारी काढण्यात आले. यात नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पदी सर्वसाधारण महिलेचे आरक्षणाची चिठ्ठी निघत्तली असून आता महापौर पदी कोण विराजमान होणार हे नांदेडकरांना आता उत्स्कुता लागली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागील चार वर्षापासून प्रलंबित राहिल्या होत्या. या न्यायालयाच्या आदेशाने या निवडणुका तिन टप्यात घेतल्या गेल्या आहेत. यात पहिल्या टप्यात नगर परिषद आणि नगर पंचायत आणि दुसर्या टप्यात महापालिका निवडणुका पार पडल्या. यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. पण महापौराचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने अनेकानंा आरक्षणाचे वेध लागले होते. दि.22 रोज गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास मुंबई येथे ना.माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील महापालिका महापौर पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यात नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सर्वसाधारण महिला या जागेवर एकूण 16 महिला भाजपाच्या तिकिटावर निवडूण आल्या आहेत.भारतीय जनता पार्टीकडे बहुमताचा आकडा असल्यामुळे महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच महापौर विराजमान होणार पण महापौरांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे मात्र खा.अशोक चव्हाण यांच्या आदेशानंतरच स्पष्ट होईल. अनेक जण या स्पर्धेत असले तरी अनेकांनी आपलीच महापौर पदी नियुक्ती व्हावी म्हणून पक्ष श्रेष्ठीकडे मागणी लावून धरत आहेत.
नांदेडचे महापौर पद सर्व साधारण महिलेसाठी आरक्षीत; नवीन चेहरा की अनुभवी महिलेला मिळणार संधी?
