मुखेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील आबादी नगर तांडा येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी अनिता शेषराव पवार यांनी मुखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १८ जानेवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारीनुसार, गावातील अशोक बालाजी पवार (वय २५, रा. आबादी नगर तांडा) व प्रशांत अशोक कळमपल्ले (वय १९, रा. पेठवडज) तसेच त्यांच्यासोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेण्यात आले.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५/२०२६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस कर्मचारी गीते हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नामनिर्देशित केलेल्या दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून विधीसंघर्षग्रस्त बालकांबाबत कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
