सोमवार दि.१९ पासून नांदेड मध्ये रंगणार बालनाट्य स्पर्धा;जास्तीत जास्त शाळांनी विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे आव्हान

नांदेड – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या वतीने २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५–२६ नांदेड येथील कुसुम नाट्यगृह येथे दि १९ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रोज जवळपास ६ नाटक सादर होणार असून नांदेड व परभणी जिल्यातील विविध संस्था व शाळांचा यात सहभाग असणार आहे.
सोमवार, १९ जाने., दु. १२:३० वा. जगण्याचा खो (अष्टविनायक नाट्य कला क्रिडा व सेवा प्रतिष्ठान, परभणी), दु. १:४५ वा. जाईच्या कळ्या (बालगंधर्व सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, परभणी), दु. ३ वा. मौनांतर (बळीराजा विद्यालय, गंगाखेड, परभणी), दु. ४:१५ वा. बेला (छत्रपती सेवाभावी संस्था, सोनपेठ, परभणी), सांय. ५:३० वा.
खोपा (ज्ञानोपासक विद्यालय, कुपटा, सेलू, परभणी)
मंगळवार, २० जाने., स. ११ वा. स्काउटर आर फायटर (ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, बोरी, ता. जिंतूर जि. परभणी), दु. १२:३० वा. लक्षप्रश्न (एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूल, सहस्त्रकुंड, नांदेड), दु. १:४५ वा. मोतीचूर (गोपाला फाऊंडेशन, परभणी), दु. ३ वा. सर तुम्ही गुरुजी व्हा ( जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, मानवत, परभणी), दु. ४:१५ वा. डायरी एका डोंगराची (जिजाऊ ज्ञानतीर्थ सेकंडरी हायस्कूल, परभणी), सांय. ५:३० वा. सक्सेस ॲप (क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्ट परभणी)
बुधवार, २१ जाने., स. ११ वा. मराठी डॉट कॉम (नटराज कला विकास मंडळ, जिंतूर, परभणी), दु. १२:३० वा. हामुरा (नृसिंव्ह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी, परभणी) , दु. १:४५ वा. जगण्याचा खो (नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू, परभणी), दु. ३ वा. कळीचे निर्माल्य (राजीव गांधी युवा फोरम, परभणी), दु. ४:१५ वा. वाघोबाच्या जाळीत (एन. व्ही. एम. मराठवाडा हायस्कूल, परभणी)
गुरुवार, २२ जाने., स. ११ वा. पाऊस (शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नांदेड) , दु. १२:३० वा. ब्लॅक कॅनव्हास (रामरावजी लोहट पब्लिक स्कूल, परभणी), दु. १:४५ वा. तेरा मेरा सपना (श्रीमती एल. एस. आर. कन्या प्रशाला, सेलू, परभणी) , दु. ३ वा. लास्ट बेंच (तन्मय ग्रुप, नांदेड), दु. ४:१५ वा. झाले मोकळे आभाळ (टायनी एंजल्स स्कुल, नांदेड), सांय. ५:३० वा. चला जाऊया रोबोटस पहायला (झपुरझा सोशल फाऊंडेशन, परभणी)

सर्व शालेय विद्यार्थी व प्रेक्षक यांना प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त विद्यार्थी व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान  विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!