नांदेड – इंधन बचतीचे महत्व व त्यासंबंधी कष्टकरी-कामगार कर्मचाऱ्यामध्ये व्यापक जनजागृती करून इंधन बचत ही काळाची गरज असून इंधन बचत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे दरवर्षी अनेक उपक्रम राबवून इंधन वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.16 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता इंधन बचत मासिक कार्यक्रम दि.16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत औपचारिकरित्या सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसटीचे विभाग नियंत्रक मा.श्री.डॉ.चंद्रकांत वडसकर हे होते तर विचार मंचावर नांदेड आरटीओ कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकअमर पायघन, श्रीमती तेजस्वीनी कलाले, एसटीचे विभागीय उपयंत्र अभियंता चालन दिग्वीजय डी. नरंगले, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, मयुर तेलंगे, चार्जमन योगेश्वर जगताप, संदीप बोधनकर, आगार लेखाकार सतिश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख .मनोहर माळगे, विनायक चव्हाण, छायाचित्रकार केशव टोणगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून आगाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उद््घाटक म्हणून उपस्थित झालेले अमर पायघन, तेजस्वीनी कलाले यांच्या हस्ते फित कापून या मासिक कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी अमर पायघन व तेजस्वीनी कलाले यांनी इंधन बचत या विषयी चालक, वाहक, यांत्रीक, कामगार-कर्मचारी यांना इंधनाचे महत्व व इंधनबचत या बाबतीत सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी दिग्वीजय नरंगले यांनीही उपस्थितांना इंधन बचतीबाबत मार्गदर्शन करून आपल्या भाषणात महत्व पटवून दिले. शेवटी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडसकर यांनी करून आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन यांत्रीक कृष्णा पवार यांनी मानले. या प्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी डेपो नांदेड आगार येथे इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरूवात
