नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अनेक पत्रकारांनी अर्ज दिले. पण तेथील जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांना दाखवलेल्या वृत्तीमुळे पत्रकारांची निराशा झाली. महानगरपालिका आयुक्त तरी चांगले बोलतील. पण पीआरओ मात्र त्यापेक्षा वरचढ असल्यासारखे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी ज्या नियमावली दाखवल्या त्या नियमावलीपेक्षा आज मतदान मोजणी कक्षात असलेल्या पत्रकारांची संख्या खुप मोठी आहे. मग त्यांना कसे दिले सुरक्षा कार्ड, जमीनीवर काम करणाऱ्या पत्रकारांना मात्र मुळात लिपीक असलेल्या आणि सध्या पीआरओचा कार्यभार सांभाळणाऱ्या बनसोडे यांनी तयार केलेली ही नवीन पध्दत घातक आहे.
आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अनंत पत्रकारात आहेत. अनेक पत्रकारांनी निवडणुक जाहीर झाली तेंव्हाच महानगरपालिकेकडे अर्ज दिले होते. पण त्या अर्जावर काय झाले याची विचारस करण्यासाठी पत्रकारांना जनसंपर्क विभागाचा रस्ता दाखविण्यात आला. त्या ठिकाणी गेल्यावर असे अनुभव अनेक पत्रकारांना आले की, मुळात पद लिपीक पण जनसंपर्क विभागा सांभाळण्याची मोठी जबाबदारी असलेल्या सुमेध बनसोडे यांनी बाहेर टेबलवरील यादी पाहा त्यात तुमचे नाव असेल तर माझ्याकडे या. असे उत्तर दिले. सोबतच काही पत्रकारांनी या यादीत आमचे नाव नाही पण आम्ही काम करतोत पत्रकारीतेचे यावर बनसोडे त्या पत्रकारांना सांगत होते की, मग मी काय करू. शासनाने वृत्तमान पत्र छापण्याचे अधिकार आपल्या आदेशाने ज्या लोकांना दिले आहेत. त्या लोकांना पीआरओ तुम्ही पत्रकार नाहीत असे कसे म्हणू शकतात.अनेक पत्रकार आज त्या मतमोजणी कक्षात असे आहेत की, ज्यांचे नाव पीआरओच्या टेबलवरील यादीत पण नाही. दररोज त्यांचा पेपर निघतो की नाही ते देवच जाणे तरी पण आज निवडणुक मतमोजणी प्रक्रियेत सहभागी आहेत. एकूणच जनसंपर्क विभाग सांभाळणे म्हणजे महानगरपालिकेसाठी एक महत्वपुर्ण जबाबदारी आहे. अगोदर तर त्या जागेसाठी ज्या पात्रता हव्यात त्या तर सुमेध बनसोडे यांच्याकडे नाहीतच. पाणी पुरवठा विभागामध्ये लिपीक असलेल्या बनसोडे यांना जनसंपर्क विभागाचा प्रमुख म्हणून कारभार देणाऱ्या व्यक्तीचे खऱ्या अर्थाने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करायला हवा.
महानगरपालिकेत लिपीक सांभाळतो जनसंपर्क विभाग
