सोनखेड (प्रतिनिधी)-सोनखेड गावातील एका देशी दारूच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानफोडी करत देशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ७,६८० रुपये किमतीची देशी दारू चोरून नेण्यात आली आहे.
याप्रकरणी दुकान चालक भास्कर उकाजी खिल्लारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे १०.४५ वाजेपासून १ जानेवारीच्या पहाटे ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी सोनखेड गावातील त्यांच्या देशी दारूच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील देशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या.
या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार हंबर्डे पुढील तपास करीत आहेत.
