नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे 3 लाख रुपये किंमतीचा एक ट्रक चोरीला गेला आहे. तसेच मांजरम ता.नायगाव येथून 3 लाख रुपये किंमतीचा ट्रक्टर चोरीला गेला आहे. केतन किशोर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 डिसेंबरच्या सायंकाळी 7.30 ते 1 जानेवारीच्या सकाळी 9 वाजेदरम्यान त्यांच्या तामसा रोडवरील उभा असलेला ट्रक क्रमांक एम.एच.26 सी.एच.0680 किंमत 3 लाख रुपये हा ट्रक कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 2/2026 दाखल केला असून पोलीस अंमलदार सुरकंटे अधिक तपास करीत आहेत.
किसन रामनाथ हसनाबादे यांच्या तक्रारीनुसार 3 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 ते पहाटे 5.30 वाजेदरम्यान मांजरम येथील त्यांच्या घरासमोर उभे असलेले ट्रक्टर क्रमांक एम.एच.26-4268 किंमत 3 लाख रुपयांचे कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. या प्रकरणी नायगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 1/2026 दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदे अधिक तपास करीत आहेत.
एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरी
