‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम 

कार्यक्रम २५ जानेवारीला नांदेडमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम  

नांदेड –  “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात ३ जानेवारी  रोजी दुपारी १२ वाजता आरंभता की अरदास या विधीने असर्जन परिसर मामा चौक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, मैदान येथे होणार आहे.

सदर आरंभता की अरदास विधी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते आणि सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल,वाल्मीकि, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय या नऊ समाजाच्या संतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या  विधीच्या माध्यमातून “हिंद-दि-चादर” उपक्रमास औपचारिक व  प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेड, मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, भाई जोसिंदर सिंघजी, भाई राम सिंघजी, भाई कश्मिर सिंघजी, भाई गुरमीत सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंघ यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी महेंद्रजी रायचुरा, विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सरजीत सिंघ गिल आणि जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, क्षेत्रीय समिती पदाधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी व राज्यस्तरीय समिती सदस्य इतर अधिकारी  यांची उपस्थिती राहणार आहे.

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाला वेग देण्यात आला असून सुरक्षा, वाहतूक तसेच कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!