राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाचा वापर आपल्या वाहनांवर करणाऱ्या खासदार आमदारांवर आता होणार कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार आणि माजी खासदार यांना आपल्या वाहनांवर अशोक स्तंभाचे चित्र वापरता येणार नाही यापुढे थेट आमदार आणि खासदारांवर सुध्दा थेट कार्यवाही केली जाईल असे वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना दिले आहेत.
मुंबईच्या उल्हासनगर भा गातील राम वाधवा यांनी ही तक्रार केली होती की, अशोक स्तंभ असलेले स्टिकर आपल्या वाहनांवर लावण्याचा अधिकारी खासदार आणि आमदार यांना नाही. देशभरात फक्त पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती, उपसभापती, राज्यसभेचे उपसभापती आणि भारताचे सरन्यायाधीश आणि न्यायमुर्ती यांना अशोक स्तंभ लावता येते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य न्यायामुर्ती, राज्यातील मंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती व उपसभापती हे राज्यात आपल्या वाहनांवर अशोक स्तंभ लावू शकतात. परंतू सध्या आमदार आणि खासदार सुध्दा आपल्या वाहनांवर अशोकस्तंभाचा वापर करून बेकायदेशीर कृत्य करत आ हेत असा तक्रारीचा आशय होता.
राष्ट्रीय चिन्हाचा गैरवापर होत असेल तर अपर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि पोली अधिक्षकांना आदेश दिले आहेत की, भारतीय राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाचे स्टिकर आपल्या वाहनांवर लावणे ही एक व्हीआयपी कलचरची पध्दती आहे. या राष्ट्रीय चिन्हाचा वापर करून टोलमााफीसाठीचा त्याचा वापर होतो. वाहतुक कोंडीतून लवकर बाहेर होण्यासाठी त्याचा वापर होता म्हणून असा गैरवापर थांबविण्यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत.राष्ट्रीय चिन्हाच्या वापर संबंधाने सन 2005 मध्ये कायदा करण्यातत आला होता. त्यानुसार आता देशाच्या गृहमंत्रालयाचे सहसचिव जी पार्थ सारथी यांनी सुध्दा असे आदेश जारी केले आहे की, सर्व राज्यातील आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार अशा राष्ट्रीय चिन्हाचा गैरवापर करत असतील तर त्यांच्याविरुध्द कार्यवाही करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!