नांदेड(प्रतिनिधी)-सध्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अर्ज परत घेण्याचा आजचाच दिवस आहे. पुढे उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होईल. तेंव्हा निवडणुकीतील उमेदवार जनतेसमोर येतील. परंतू प्रभाग क्रमांक 16(ब) मधील शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवार निता गौतम हिरावत यांनी निवडणुक पुर्व व विजयानंतर भविष्यातील वचन नामा प्रसिध्द करून मतदारांना एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रभाग क्रमांक 16 (ब) च्या शिवसेना(उबाठा गटाच्या) उमेदवार निता गौतम हिरावत(जैन) यांनी जाहीर केला वचननामा 100 रुपयांच्या मुद्रांक कागदावर असून त्यात त्यांनी लिहिले आहे की, प्रभागामध्ये एक चांगली शाळा उभारण्यासाठी काम करणार, नांदेड महानगरपालिका ड दर्जाची आहे. परंतू महानगरपालिकेकडून घेतला जाणारा कर अ महानगरपालिका दर्जा आहे. मी निवडूण आल्यानंतर तो कर ड दर्जाचाच घ्यावा यासाठी लढा देणार आहे. प्रसंगी न्यायालयात सुध्दा जाणार आहे. आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी उपाय योजना करणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करेल. आजच्या परिस्थितीत 365 दिवसांमध्ये जेवढ्या दिवस पाणी पुरवठा होईल. तेवढ्याच दिवसाचा प ाणी पुरवाठा कर घ्यावा असे आवाहन करणार आहे. महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. प्रभाग क्रमांक 16 (ब) मध्ये दवाखान्याची सुविधा सुधारण्यासाठी काम करणार आहे. प्रभांगामधील रस्ते, नाल्या, उत्कृष्ट अवस्थेत असाव्यात या साठी काम करणार आहे. हॉकर्स झोन आणि नॉन होकर्स झोन तयार करून हनुपेठची वाहतुकीमुळे होणारी कोंडी सोडविणार आहे. प्रभांगामधील सर्व नागरीकांचा मोबाईल क्रमांक घेवून हनुमानपेठ समस्या निवारण व्हासऍप गु्रप तयार करून काम करणार आहे.
प्रभागांमध्ये आधार कार्ड सेंटर उभारणार आहे. महावितरण सोबत पत्रव्यवहार करून प्रभागातील डी.पी.अवस्था सुधारणा करून घेणार आहे. आजच्या जगात वायफाय ही सुविधा सर्वांसाठीच आवश्यक असून ती कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.रस्त्यांवर फिरणाऱ्या गोवंशासाठी गोशाळा उभारून त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न करणार आहे. गोदावरी नदी नाले मुक्त करणार आहे. युवा आणि कौशल्य विकासामार्फत युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सुरू करून लघु उद्योगांना प्रोत्साहित करणार आहे यामुळे रोजगार उपलब्ध होईल. शिक्षण सुधारणा व ज्ञान वाढविण्यासाठी वाचनालय, अभ्यासिका, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल क्लास, युपीएससी, एमपीएससी परिक्षांसाठी सुविधा देणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वाढ करून शहराची सुरक्षा मजबुत होईल असे प्रयत्न करणार आहे. महिलांच्या बचत गटांची निर्मिती करून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य त्यांना देणार आहे.
अशा 19 वचनांचे हे शपथपत्र निता हिरावत यांनी जनतेसाठी खुले गेले आहे. ही एक नवीन पदती निता हिरावत यांनी समोर आणली असून ज्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याचा हा भाग जनतेसमोर मांडला आहे. निवडणुकांमधील मोठ-मोठी बोली आणि काम शुन्य अशाच पध्दतीने निवडणुका चालतात त्याला हा एक वेगळा कलाटली देणारा प्रचाराचा भाग प्रशंसनिय आहे.
महानगरपालिका प्रभाग निवडणुकीत उमेदवार निता हिरावत यांचा नागरीकांना वचननामा
