नांदेड- येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रल्हाद हिंगोले यांना भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधन पर्व या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा हदगाव अंतर्गत जयवंत सेवाभावी संस्था उमरी (जहांगीर) यांच्या संयुक्त विद्यमाने उमरी येथील भीमा कोरेगाव प्रतिकृती स्तंभ उमरी (जहांगीर) येथे १४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रबोधन पर्व भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधून ‘प्रबोधन पर्व’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण कदम, उपाध्यक्ष सुरेशराव कोकरे, कोषाद्यक्ष आर. जी. सदावर्ते, सचिव प्रशांत कावळे, सहसचिव शंकर कदम, सल्लागार वसंत पाटील, सहसल्लागार प्रकाश कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष व बौद्ध महासभेचे जिल्हा कार्यालयीन सचिव सा.ना. भालेराव, वामनदादा कर्डक जयंती मंडळाचे अध्यक्ष संजय निवडंगे, प्रभु सावंत, चिकाळा-शिवपूर धम्म परिषदेचे अध्यक्ष बोधीवृक्ष कदम, हदगाव तालुका वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष जयकिन रावळे, भीमसावली सेवाभावी संस्था हदगावचे अमोल कदम,नागेश गायकवाड, कुणाल लोणे शेंदणकर आदी उपस्थित होते.
