उमरगा (प्रतिनिधी)- लोकप्रिय नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कल्पनेप्रमाणे वह्या, पेन पुस्तके प्रा.जीवन जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार मराठवाडा यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शांतीदूत श्याम पाटील यांनी शांतीदूत परिवार स्मरणिका, डॉ. योगिता जाधव कराळे यांनी श्री कृष्ण मूर्ती सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार, डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से.नि.यांचे हस्ते शाल व रोप देऊन गौरव करण्यात आला. शांतीदूत परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करून पुढील प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी शांतीदूत पत्रकार लक्ष्मण पवार, नसीरुद्दीन फकीर पेंटर संतोष चव्हाण, युवा नेते योगेश तपासाळे, सांगवे, संतोष मोहिते पाटील अनेक बाल शांतीदूत व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. पुनश्च एकदा किरणभय्या गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन..

