नांदेड जिल्हा पोलीस दलातील सेवा निवृत्त सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून ३१ डिसेंबर रोजी आपला प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करून सात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. यामध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस अमलदार यांचा समावेश आहे. त्यांच्या सन्मानार्थ नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात सहकुटुंब सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक भारत पंडितराव सावंत (पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड), मोहम्मद अदिलोद्दीन काझी (पोलीस ठाणे इतवारा), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आत्माराम दत्तात्रय वेदपाठक (पोलीस ठाणे अर्धापूर), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धोंडीबा माधवराव भुते (पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सिताराम पवार (पोलीस मुख्यालय, नांदेड), पोलीस अमलदार बाळासाहेब नरोबा पंधरे (पोलीस ठाणे हदगाव) व पोलीस अमलदार वामन दासू राठोड (पोलीस ठाणे लोहा) यांचा समावेश आहे.

दुपारी आयोजित या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. यावेळी त्यांनी पोलीस दलातून निरोप देताना, “नांदेड जिल्हा पोलीस दल तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी सदैव तत्पर राहील,” असे आश्वासन दिले.

या समारंभाला पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचक शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रियाज यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अमलदार नरेंद्र राठोड, पोतदार व सविता भीमलवाड यांनी उत्कृष्टरीत्या केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!