नांदेड – पोखरभोसी ता.लोहा जि.नांदेड येथील सहशिक्षक नरसिंग रेगलवाड हे 31 डिसेंबर 2025 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांचे मुळगाव पिंपळकौठा (मगरे) ता.मुदखेड जि.नांदेड हे असून त्यांनी शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीत डीएडचे शिक्षण पूर्ण केले व सहशिक्षक म्हणून प्रथम चिखली (बु) ता.किनवट जि.नांदेड येथे रुजू होऊन 5वर्ष 7महिने सेवा केली. त्यानंतर ईजळी (नवीन) ता.मुदखेड जि.नांदेड येथे 11वर्ष सेवा दिली.निळा ता.लोहा. जि.नांदेड येथेही 5वर्ष सेवा केली . त्यानंतर पोखरभोसी ता.लोहा जि.नांदेड येथे 7वर्ष 7महिने सेवा देऊन दि.31डिसेंबर 2025 मध्ये आपली 29वर्षाची सेवा देऊन शिक्षण खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत.
कर्तव्यनिष्ठ , अभ्यासू ,शिस्तप्रिय ,मनमिळाऊ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते परिचित आहेत .त्यांना सेवानिवृतीच्या खूप खूप शुभेच्छा !
नरसिंग रेगुलवाड सहशिक्षक यांची सेवानिवृती
