नांदेड/माळेगाव : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या यात्रेचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” भव्य आरोग्य प्रदर्शनी” चे उद्घाटन कंधार लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते दि.१८ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. दि.१८ ते २५ डिसेंबर या कालावधीत ही प्रदर्शनी भाविकांसाठी खुली असणार आहे. शासकीय योजनांची माहिती आणि जनजागृती या प्रदर्शनीमध्ये शासनाच्या सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची सविस्तर माहिती देणारे स्टँड्स, आकर्षक बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्या विषयीची माहिती पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत भाविकांना विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि आरोग्य शिक्षण दिले जात आहे.
मोफत आरोग्य तपासणी आणि समुपदेशन
प्रदर्शनीमध्ये केवळ माहितीच नाही, तर प्रत्यक्ष आरोग्य सुविधाही पुरवल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील तपासण्या मोफत केल्या जात आहेत:
• सिकलसेल तपासणी,
• सीवाय टीबी (CY-TB) तपासणी,
• एचआयव्ही (HIV) तपासणी
यासोबतच विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जात आहेत. आरोग्य शिक्षणासाठी फ्लिपचार्ट, घडी पत्रिका आणि पॅम्पलेट्सच्या माध्यमातून नागरिकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

* कलापथकाद्वारे जनजागृती :
आकर्षणाचे केंद्र
या प्रदर्शनीचे विशेष आकर्षण म्हणजे ‘कलापथक’. आरोग्य विषयांवरील पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून हे कलापथक हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेत असून मनोरंजनातून प्रबोधन करत आहे. प्रशासकीय नियोजन आणि उपस्थिती
या भव्य उपक्रमाचे,नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले. यासाठी स्वतः परिश्रम घेतले आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली टीम कार्यें करत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम, लातूर आरोग्य उप संचालक मा. डॉ रेखा गायकवाड मॅडम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही प्रदर्शनी राबवण्यात येत आहे.
उद्घाटन प्रसंगी मा शरद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ अमृत चव्हाण,पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. “यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहावे,” असे आवाहन आरोग्य विभागातर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे. यावेळी आरोग्य निरीक्षक सुभाष खाकरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे, हिवताप विभागचे सत्यजीत टिप्रेसवार, क्षयरोग विभाग माणिक गित्ते, भावसार, हत्तीरोग विभागाचे व्यंकटेश पुलकंठवार, आरोग्य कर्मचारी हणमंत घोरबांड, धनंजय लालवंडीकर, आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा कालावधी दि.१८ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२५, स्थळ आरोग्य प्रदर्शन विभाग, माळेगाव यात्रा मैदान.
