श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला उद्यापासून प्रारंभ; देवस्वारी-पालखी पूजन

 

नांदेड –  दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेला आजपासून देवस्वारी व पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनही आज करण्यात येणार आहे.

     उद्या दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता देवस्वारी व पालखी पूजन संपन्न होणार असूनयावेळी इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकासअपारंपारिक ऊर्जादिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल मोरेश्वर सावे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणमा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटीलखासदार डॉ. अजित गोपछडेखासदार रवींद्र चव्हाणखासदार डॉ. शिवाजी काळगेखासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह आमदार सतीश चव्हाणआमदार विक्रम काळेआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार भीमराव केरामआमदार डॉ. तुषार राठोडआमदार बालाजीराव कल्याणकरआमदार राजेश पवारआमदार जितेश अंतापुरकरआमदार आनंदराव बोंढारकरआमदार बाबुराव कदम कोहळीकरआमदार श्रीजया चव्हाणविशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावलीजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमाळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

      दिनांक 18 डसेंबर रोजी दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची विशेष उपस्थिती राहणार असून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार आनंदराव बोंढारकरआमदार राजेश पवार व कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

उद्या अश्व-श्वान-कुक्कुट प्रदर्शन व महिला-बालकांसाठी स्पर्धा

माळेगाव यात्रेच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सकाळी 10 वाजता अश्वश्वान व कुक्कुट प्रदर्शन तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असूनखासदार डॉ. अजित गोपछडे व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख उपस्थितीत आमदार सतीश चव्हाणआमदार विक्रम काळेआमदार डॉ. तुषार राठोडआमदार बालाजीराव कल्याणकर तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त राजकुमार पडिले उपस्थित राहणार आहेत.

      सकाळी 11 वाजता माळेगाव यात्रेत महिला व बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असूनया कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असूनआमदार श्रीजया चव्हाण व आमदार जितेश अंतापुरकर हेही उपस्थित राहणार आहेत. श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने धार्मिकसांस्कृतिक व कृषी-पशुसंवर्धन उपक्रमांमुळे माळेगाव यात्रेला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!