54 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड आणि नांदेड ग्रामीण पोलीसंानी वाळू माफीयांविरुध्द जोरदार कार्यवाही करून 54 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वासरी ता.मुदखेड येथील पोलीस पाटील शुभांगी येडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास वासरी नदीपात्रात पोलीस पथकाने आणि महसुल पथकाने मिळून तपासणी केली तेथे अवैध पणे वाळू उपसा करण्याचे दोन इंजिन आणि 5 ब्रास वाळू सापडली. या सर्व साहित्याची किंमत 14 लाख 10 हजार रुपये आहे. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा क्रमांक 229/2025 दाखल केला आहे. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक डॅनियल बॅन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक धीरज चव्हाण, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलीस अंमलदार कदम, कौठेकर आणि महसुल पथकाने केली आहे.
दुसऱ्या एका घटनेत 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास बोंढार गावाच्या समोर रस्त्यावर पोलीसांनी एम.एच.26 बी.डी.4100 हा वाळू भरलेला हायवा पकडला. त्यामध्ये 4 ब्रास अवैध वाळू भरलेली होती. या संदर्भाने पोलीस अंमलदार समीर अहेमद शब्बीर अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन माधव निरंज गिरी (37) रा.लोहा जि.नांदेड आणि मधुकर अरुण दिघे (40) रा.आनंदनगर नांदेड या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 1202/2025 दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, समीर अहेमद, जमीर अहेमद, धम्मपाल कांबळे, शेख आसीफ यांनी केली.
