ठाणे (प्रतिनिधी) – सन २०१९ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात चालक पोलीस शिपाई या पदावर भरती झालेल्या अकरा पोलीस अमलदारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) श्रीकांत पाठक यांनी हा निर्णय घेतला असून, संबंधित आदेश १५ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल एसएलपी (स्पेशल लीव्ह पिटीशन) क्र. 11353/2024 या प्रकरणात ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, ठाणे पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आणि निवड झालेल्या अकरा उमेदवारांची सेवा १५ डिसेंबर २०२५ पासून समाप्त करण्यात आली आहे.सेवा समाप्त करण्यात आलेल्या अकरा पोलीस अमलदारांमध्ये दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सेवा समाप्त करण्यात आलेले चालक पोलीस अमलदार पुढीलप्रमाणे :
- महेश परमेश्वर टकले (बकल नं. 4488)
- शैलेश अनिल पेंढारे (बकल नं. 6198)
- अमोल विठ्ठल खांडेकर (बकल नं. 709)
- नितीन पांडुरंग शेजवळ (बकल नं. 6210)
- शिवाजी पंढरी पवार (बकल नं. 6207)
- किरण शेषराव नरोडे (बकल नं. 6194)
- संदीप दिलीप शिंदे (बकल नं. 6264)
- बालाजी सिद्राम शिंदे (बकल नं. 6261)
- पंकज लहू फणसे (बकल नं. 6180)
- पूजा मनोज आडसुळे (बकल नं. 6223)
- रेश्मा चांद शेख (बकल नं. 6152)
वरील सर्वांची सेवा १५ डिसेंबर २०२५ पासून समाप्त करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.
वास्तव न्यूज लाईव्हचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना नम्र पण ठाम आवाहन करण्यात येते की, एकाच जागेसाठी एकच अर्ज सादर करा. अनेक ठिकाणी अर्ज केल्यास ही बाब कधीतरी उघडकीस येते आणि त्यामुळे तुमचे करिअर, भविष्य आणि मेहनत सर्व काही धोक्यात येऊ शकते.कायद्याचे पालन करा, पारदर्शकतेने स्पर्धा करा आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवा.
