‘काव्यरेखा’ ह्या प्रथम कविता संग्रहाचे प्रकाशन

नांदेड (प्रतिनिधी)-अधुनिक वाल्मिकी गदीमा यांच्या स्मृतिदिन व नांदेड को.ऑप. बँकेचे माजी व्यवस्थापक राजन करकरे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सौ. आरती सुनिल मुळजे लिखीत काव्यरेखा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा विसावा हॉटेल, नांदेड येथे ११.३० वाजता पार पडला. यावेळी माझ्या वाढदिवसाचे औचित्स साधून काव्यरेखा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल तसेच ‘माणसे जोडण्याचा वारसा मला माझी आई डॉ. यमुताई करकरे यांच्याकडून मिळाला’ असे भावउदगार राजन करकरे यांनी व्यक्त केले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजन करकरे हे होते तर काव्यरेखा कविता संग्रहाचे प्रकाशन सौ. अलका कुलकर्णी माजी मुख्याध्यापिका, पीपल्स हायस्कुल, नांदेड, सौ. मंगल शौनक जोशी माजी उपमुख्याध्यापिका, पीपल्स हायस्कुल, नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्याक्रमास प्रमुख वक्ते म्हणुन प्रसिध्द साहित्यीक, समिक्षक व माजी उपप्राचार्य नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय, नांदेडचे डॉ. दिपक कासराळीकर, प्रा. मदन मुळजे, माजी प्राध्यापक, कुमारस्वामी महाविद्यालय, औसा हे होते.
दरम्यान नांदेड को-ऑप. बँकेचे माजी व्यवस्थापक राजन करकरे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यास उत्तर देताना म्हणाले की, ‘माणसे जोडण्याचा वारसा मला माझी आई डॉ. यमुताई करकरे यांच्याकडून मिळाला’, माझ्या मुलांचे मला कौतुक आहे त्यांनी केलेल्या या कार्यक्रमामुळे मी भारावून गेलो. हा कार्यक्रम नांदेड येथील विसावा हॉटेल येथे आयोजित करून एक दैदिपमान माझ सन्मान करण्यात आला व आलेल्या सर्वच पाहुण्याचे त्यांनी आभार मानले.
या सोहळ्याच्यानिमित्ताने मुद्दाम पुण्याहून आलेले त्यांचे घनिष्ठ स्नेही  सूर्यकांत पांडे यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. कर्मचार्‍यांना अत्यंत आपुलकीने व सहृदयतेने ते वागवीत होते. टापटीप राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. नाट्य कलावंत व त्यांचे जेष्ठ बंधू श्री दिलीप पाध्ये यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी यशस्वी मात केली. प्रसिध्द साहित्यीक, समिक्षक व माजी उपप्राचार्य नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय, नांदेडचे डॉ. दिपक कासराळीकर वक्ते म्हणुन बोलताना म्हणाले की, काव्य संग्रह म्हणजे एक आपुलकीचा ठेवाच आहे. जे सुचले ते नाही तर जे सोसले ते त्यांनी लिहिले. त्यामुळे कवितेत जिवंतपणा आला आहे. स्त्री सहज सुलभवृत्तीचे दर्शन यात घडते. या संग्रहात चारोळ्याही आहेत. कवयित्रीचे अनुभव विश्व खूप मोठे आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांची मुलगी डॉ. सौ. आरती मुळजे यांच्या ‘काव्यरेखा’ ह्या प्रथम कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या निमित्ताने पीपल्स हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. अलका कुलकर्णी पुस्तकाचे प्रकाशन करताना म्हणाल्या, ‘स्वतःच्या आईला समर्पित केलेल्या या संग्रहात आईवरच्या कविता हृदयस्पर्शी व आईच्या स्मृती जागवणार्‍या आहेत.’ मनोगत व्यक्त करताना कवयित्री डॉ. आरती करकरे मुळजे म्हणाल्या, ‘ज्यांनी घडविले त्या शिक्षिकेच्या हस्ते प्रकाशन होत आहे याचा खूप आनंद होत आहे. ज्यांच्या संस्कारामुळे आम्ही इथवर आलो त्यात बाबांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन होणे हा अविस्मरणीय क्षण आहे. माझ्या या कविता प्रकाशात आणण्याचे खरे श्रेय माझी धाकटी बहीण  सौ. स्वाती करकरे कुलकर्णी हिचेच आहे.लातूरचे प्राध्यापक मदन मुळजे म्हणाले, आरती मुजळे हिचा कवितासंग्रह म्हणजे आमच्या कुटुंबातील पहिलेच पुस्तक प्रकाशन आहे. याचा आनंद होत आहे. ‘माहेरचे अंगण’ या कवितेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, माहेर सर्व स्त्रियांना प्रिय असते पण माहेर प्रमाणेच सासरची माणसे जोडून तिने सासरलास माहेर केले आहे.
पाहुण्यांचा परिचय समीर करकरे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे नेटके निवेदन सौ. स्वाती कुलकर्णी यांनी केले तर सौ. राधिका करकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!