नांदेड (प्रतिनिधी)- फेब्रुवारी 2025 पासून घरात होत असलेल्या चोरीचा प्रकार अखेर 8 डिसेंबर 2025 रोजी घरमालकाच्या निदर्शनास आला. याप्रकरणी घरात काम करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध 2 लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा गुन्हा वजीराबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
नंदलाल परसराम जगवानी (रा. महविर चौक नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरात काम करणाऱ्या प्रेमलाबाई उर्फ अनिता बालाजी मोरे (वय 46) व शिवानी मोरे (वय 23) दोघी रा. हडको, नांदेड यांनी फेब्रुवारी 2025 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांच्या घरातून एकूण 2 लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.या तक्रारीवरून वजीराबाद पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा क्रमांक 502/2025 भारतीय न्याय संहिते अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोयने करीत आहेत.
