नांदेड :- सार्वजनिक आरोग्य सेवा मध्ये कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत माहे ऑक्टोबर २०२५ अखेर झालेले कामाचे
आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती अतंर्गत कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत माहे ऑक्टोबर २०२५ अखेर झालेल्या कामाचा राज्यातील जिल्हा व महानगर पालिका निहाय राज्य स्तरावर अहवाल दिनांक १७/११/२०२५ रोजी डाउनलोड करण्यात आलेला आहे. त्यानूसार सर्व जिल्हे व मनपा यांचा गुणानुक्रम अहवाल तयार करण्यात आलेला आहे. त्या मध्ये नांदेड जिल्हा माता बालसंगोपन कार्यक्रमात गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा देण्यामध्ये अव्वल क्रमांक टाप फाईव्ह मध्ये स्थान मिळाले असल्याचे महाराष्ट्र शासन कुटुंब कल्याण व माता बालसंगोपन व शालेय अतिरिक्त संचालक डॉ संदीप सागळे आरोग्य सेवा पुणे यांनी पत्र द्वारे प्रसिद्ध केले आहे अहवालाच्या ठळक बाबी खालील प्रमाणे :
राज्यस्तरावर माहे ऑक्टोबर २०२५ अखेर सर्व निर्देशांकाचे काम ठरवुन दिलेल्या उद्दिष्टानुसार पूर्ण होणे अपेक्षित होते.
माता आरोग्य कार्यक्रम –
यामध्ये एकूण गरोदर माता नोंदणी १२ आठवडयापुर्वी प्रसुतीपुर्व नोंदणी , गरोदर मातांचे लसीकरण आयएफए १८० गोळया , प्रसुतीपुर्व ४ तपासण्या या सर्व निर्देशांकाचे कामे तसेच अतिजोखमीच्या माता तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर माता आढळल्या व यापैकी तीव्र रक्तक्षय असलेल्या मातांना उपचार देण्यात आले. एकूण प्रसुतीचे प्रमाण आरोग्य संस्था मध्ये करने
बाल आरोग्य कार्यक्रम –
यामध्ये जिवंत जन्माची नोंदणी करण्यात आली. तर २.५ कि.ग्र. पेक्षा कमी वजन असलेल्या बालकांचे प्रमाण कमी दिसून येते. नांदेड जिल्हा राज्यात टाप फाईव्ह मध्ये येण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्दशनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी नियोजन करून जिल्हातील सर्व आरोग्य यंत्रणा कामी लावली एवढेच नसून स्वतः ग्रामीण भागातील लाभार्थीना माता बालसंगोपन कार्यक्रमात आरोग्य सेवा उपलब्ध करून आरोग्य यंत्रणा देतात कि नाही याची खात्री करण्यासाठी अचानक पणे प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, गाव स्तरावरील ताडा वाडी, वस्ती, विट्ट भट्टीकारखाने, साखर कारखाने, भेटी देऊन प्रभावी पणे सनियंत्रण केले मुळे नांदेड जिल्हाचा मान उंचावल्या आहे त्या बदल त्याच्या वर अभिनंदन वर्षीव होत आहे, या बाबतीत त्यांची प्रतिक्रिया घेतली असता हे यश माझ्या एकटेचे नसून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम याचे मार्गदर्शन जिल्ह्यातील गाव वाडी ताडेवर काम करणारे गावपातळीवर कर्मचारी पासून जिल्हा स्तरावरील आरोग्य यंत्रणा मधील सर्व अधिकारी व कर्मचारी याचे यश आहे या वर्ष मध्ये राज्यात कुटुंब कल्याण व माता बालसंगोपन कार्यक्रमात आरोग्य सेवा देण्यासाठी अजून टाप येण्यासाठी आरोग्य सेवा देईल असे मनोदय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी केला आहे.
