नांदेड जिल्हयात  दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना; तिघांकडून व्यक्तीची लूट, तर दुकानात घुसून कपडे व रोख रक्कम लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- परिसरात दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.

पहिली घटना : व्यक्तीला लुटून दुचाकीसह पळ

10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास पिंपळगाव पाटी ते देगाव रस्त्यावरून ऋषिकेश सुधाकर खानसोळे हे MH 26 W 0130 क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. यावेळी मनोज गौतम सावते (रा. वैशाली नगर, नांदेड), गोविंद मनोज खंडागळे (रा. अशोक नगर, नांदेड) आणि साईनाथ शंकर धुळे (रा. रावणगाव, ता. हदगाव) यांनी त्यांना अडवून त्यांच्या खिशातील रोकड, मोबाईल फोन असा एकूण १९,२०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला.यानंतर आरोपींनी खानसोळे यांची दुचाकीही पळवून नेली.यांनी धैर्य दाखवत आरोपींपैकी एकाला पाठलाग करून पकडले, तर दोघे पळून गेले.या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 136/2025 दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

दुसरी घटना : दुकानात घुसून कपडे व रोकड चोरी

११ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता जुना मोंढा भागातील रणजीतसिंग मार्केटमधील तळमजल्यावर द=कापडाची दुकान असलेल्या रोहित सुधीर श्रीमनवार यांच्या कपड्यांच्या दुकानात सुरज भगवान खिराडे (रा. असर्जन, नांदेड) आणि धनराज उर्फ राणा दीपकसिंह ठाकुर हे दोघे घुसले.दोघांनी दुकानातील काही कपडे तसेच रोकड असा मिळून २,९५० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेला.या प्रकरणी इतवारा पोलिसांनी  गुन्हा क्र. 369/2025 दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!